नुकसान झालेल्या जमीनी व पिकांचे तात्काळ पंचनामे करा

आ.डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाची मागणी

0 21

 

 

पालम, प्रतीनीधी – विधानसभा मतदारसंघात गेल्या आठवडाभराच्या सततच्या पावसाने नदी,ओढा व नाल्या काठच्या जमिनी व पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत नदी,ओढा व नाल्या काठच्या जमिनी व त्यामध्ये असलेल्या पिकांचे जे काही नुकसान झाले असेल त्याचे तात्काळ पंचनामे करावे अशा मागणीचे निवेदन दि 13 रोजी बुधवारी तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मित्र मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव रोकडे प्रभारी माधवराव गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले आहे.

 

सातत्याने शेतकऱ्यावर येणारे संकटाचे सामने मात्र संपता संपेना असे कसे झाले आहे. कोरोना काळातून उभारी घेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी यावर्षी सुरुवातीला शेतीसाठी आवश्यक खते, बी बियाणे यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू होती. परंतु त्यावेळी आमदार गुट्टे यांनी वेळीच हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवली होती.

 

यावर्षी सुरुवातीपासून चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विविध पिकाची पेरणी केली पेरलेली बियाणेही चांगल्या प्रकारे उगवले होते. परंतु परिसरामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उगवण झालेल्या पिकांचेही नुकसान होत असल्याने बळीराजाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने नदी, नाल्या काठच्या जमिनीतील माती व त्यामधील पिकांचेही नुकसान होत आहे. नुकसान झालेल्या जमीनी व पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी रासपाचे प्रांत उपाध्यक्ष गणेशराव रोकडे,पालम,पुर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, बालासाहेब रोकडे, गणेशराव घोरपडे ,बाबासाहेब एंगडे, भगवान शिरसकर ,उबेदखाँ पठाण ,गफार कुरेशी ,शिवराम पैके,युसुफ सय्यद ,विजय घोरपडे, गणेश हतीअंबीरे,विनायक पौळ, मोबीन कुरेशी, असदखाँ पठाण, रहीमतुखाँ पठाण, नवनाथ पौळ,गजानन घोरपडे, राजन भाळे, महाधन शिंदे ,राहुल शिंदे ,आजीम पठाण ,मोबीन कुरेशी,गौस शेख,आदी कार्यकरत्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

error: Content is protected !!