परभणीत सहकार विभागाचे वसमत रोडसह पारदेश्वर मंदिर परिसरात बड्या व्यक्तीच्या घरी छापे

0 857

परभणी,दि 13 ः येथील  सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयास प्राप्त अवैध सावकारी तक्रारीच्या  अनुषंगाने सावकाराचे सहाय्य्क निबंधक नानासाहेब कदम यांच्या आदेशान्वये सहकार विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकांनी शहरातील एका बड्या व्यक्तीच्या दोन ठिकाणी गुरुवारी (दि.13) छापे टाकत कागदपत्रे जप्त केली आहेत.

दोन पथकांनी ही कारवाई वसमत रोड व पारदेश्वर मंदिराच्या परिसरातील राहते घरी व दुकानात केली. यामध्ये अवैध सावकारीच्या संबंधाने पुरावे आढळून आलेले आहेत. या कारवाईमध्ये पथक प्रमुख क्रमांक १ म्हणून श्रीमती ए.जी. निकम, व पथक प्रमुख क्रमांक २ म्हणुन एस.पी. बाशवेणी यांनी काम पाहीले. सदर पथकात पी.जी. बाहेकर, एस. एम.कनसटवाड, ए.के. कदम, बी. टी. लिंगायत, श्रीमती एस.व्ही. देशपाडे, ए.यु. राठोड, जी. एम.कदम, शासकीय पंच म्हणून श्रीमती एस. एस. गंधम, श्रीमती एस. एम. साबळे, पोलीस बंदोबस्त म्हणुन टी. ए. शेख, बी.  एस. पोले, व्ही. आर. चव्हाण, एस. के. देशपाडे, बी. एस. कदम, टी.जी. चोपडे यांनी कामकाज पार पाडले.
कार्यवाही जिल्हाधिकारी आंचल गोयल, विभागीय सहनिबंधक, योगीराज सुर्वे, पोलीस अधिक्षक जयंत मीना व  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सावकाराचे सहाय्यक निबंधक नानासाहेब कदम यांच्या आदेशान्वये पार पडली.

तक्रार करण्याचे नानासाहेब कदम यांचे आवाहन
शेतकरी, नागरीक तसेच लहान-मोठे उद्योजक यांनी विनापरवाना सावकारी करणाऱ्या व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारचा अर्थिक देवाण-घेवाणीचा व्यवहार करु नये. त्यांना आवश्यकता भासल्यास त्यांनी नोंदणीकृत परवानाधारक सावकाराकडुन कर्ज स्वरुपात रक्कमा घ्याव्यात. परभणी तालुक्यात एकुण 62 परवानाधारक सावकार आहेत. संबंधित परवानाधारक सावकाराकडूनच पावती घेवून कर्ज घ्यावे या व्यतिरीक्त विनापरवाना, अवैध सावकारी करणा-या इसमांकडून कर्ज घेऊ नये किंवा सावकारीचा व्यवहार करु नये. कोणी व्यक्ती अवैध सावकारी व्यवसाय करत आहे किंवा अवैध सावकारीच्या व्यवहारातून एखादया शेतक-याची, नागरीकाची जमीन, घर, वाहन, सोने किंवा कोणतीही स्थावर किंवा जंगम मालमत्ता विक्री, गहाण, भाडेपट्टा विनियम किंवा अन्य रुपाने सावकाराच्या कब्जात असेल तर त्या संबंधीच्या पुराव्यासह सावकारांचे सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. परभणी नवा मोंढा, किसान बँकेच्या शेजारी या ठिकाणी तक्रार दयावी. सदर तक्रारीवर महाराष्ट्र सावकारी ( नियमन ) अधिनियम, २०१४ मधील तरतुदीनुसार दिवाणी प्रक्रीया संहीता 1908 अन्वये दिवाणी न्यायालयाच्या अधिकाराप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन सावकारांचे सहाय्यक निबंधक नानासाहेब कदम  यांनी केले आहे .

error: Content is protected !!