एक हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी महसूल सहायक जाळ्यात 

0 84

 

 नारायण पाटील
सेलू,दि 11 ः
तक्रारदार यांनी तहसील कार्यालय सेलू येथे केलेल्या अर्जाप्रमाणे त्यांच्या आईचे संजय गांधी निराधार योजनेतील  अनुदान मिळवून देण्यासाठी लोकसेवक संदीप तमशेटे महसूल  सहायक ( वर्ग ३ ) यांनी त्यांच्या कार्यालयात स्वतः १०००रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही करण्यात आली आहे .

ला . प्र .विभाग नांदेड परिक्षेत्राचे  चे पोलीस अधीक्षक  डॉ राजकुमार शिंदे व अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण  व  ला .प्र .विभाग परभणीचे पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे   यांच्या मार्गदर्शनाखाली  परभणी ला .प्र .विभागाचे  चे पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे व पोलीस निरीक्षक  बसवेश्वर जकीकोरे तसेच सोबत  पोलीस हवालदार हनुमंते,कटारे,शेख मुकीद ,चालक कदम आदींनी ही कार्यवाही पूर्ण केली .या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे करीत आहेत .

error: Content is protected !!