श्रीरामनगर सोसायटीच्या निवडणुकीत पुन्हा भिमराज काळे गटाकडे सत्ता कायम

0 49

रामभाऊ आवारे
निफाड,दि 21 ः
श्रीरामनगर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली या निवडणुकीत सत्ताधारी भिमराज काळे यांच्या नेतृत्वाखाली समर्थ पॅनल ची निर्मिती करण्यात आली होती तर विरोधी रंगनाथ भाऊ शिंदे, रावसाहेब गोळे यांच्या नेतृत्वाखाली आपला पॅनलची निर्मिती करण्यात आली होती दोन्ही पॅनलमध्ये ११ जागासाठी सरळ सरळ लढत होऊन या निवडणुकीत सत्ताधारी भिमराज काळे गटाने आपली सत्ता कायम राखली आहे

निफाड पासुन अवघ्या तीन कीलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीरामनगर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची निवडणूक शांततेत पार पडली निवडणूक सत्ताधारी भिमराज काळे यांच्या नेतृत्वाखाली समर्थ पँनल व विरोधी रंगनाथ भाऊ शिंदे ,रावसाहेब गोळे यांच्या नेतृत्वाखाली आपला पँनलची निर्मीती करण्यात आली होती या दोन गटात सरळ सरळ लढत झाली नामनिर्देश पत्र भरल्यानंतर छाननी प्रसंगी विरोधी गटाचे दोन जागेवरील नामनिर्देशन पत्र अवैध झाल्याने सत्ताधारी भिमराज काळे गटातील अनु- जाती/ जमाती या राखीव जागेत विजयकांत भागाजी खडताळे तर भटक्या-विमुक्त जाती/जमाती या राखीव जागेतुन श्रीमती ताराबाई माधव गोसावी हे बिनविरोध निवडून आले होते तर झालेल्या मतदानातुन कर्जदार सर्व साधारण गटातुन भिमराज निवृत्ती काळे ( ३४०), सुदाम रामकृष्ण काळे (२८७) ,अशोकराव दगु कोंढरे (२७९ ), संपतराव नाना खताळे (३१२ )अरुण विठ्ठल गाडेकर (२७६), किरण रामभाऊ जाधव (२५२) भाऊसाहेब रामनाथ शिंदे (२७१) भाऊसाहेब हरीभाऊ शिंदे (२८३) स्री राखीव – मंगला भागवत शिंदे (२८३) ,शोभा विनायक शिंदे ( ३२१ ) इतर मागास प्रवर्ग या ठीकानी भगवान मारुती शिंदे ( २९४ ) हे सर्व उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे विरोधी गटाला एकही जागा मिळाली नाहीत सत्ताधारी भिमराज काळे गटाने सत्ता कायम राखल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत.

मागील कालखंडाप्रमानेच संस्थेचा कारभार पारदर्शी व सभासद हिताचा विचार करुन केला जाईल. सभासदांच्या अडचणी सोडविण्यासाठी संचालक मंडळ कटीबध्द आहेत.
भिमराज काळे
माजी.चेअरमन
श्रीरामनगर वि.का.सह.सोसा.

error: Content is protected !!