‘बाई वाडयावर या 2.0’ या गाण्यात मानसी नाईकच्या दिलखेचक अदांनी केलं रसिकांना घायाळ, पहा व्हिडिओ

0 163

आपल्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या मानसी नाईकचं ‘ बाई वाडयावर या 2 ‘ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांनी पसंती दाखवली असून गाणं प्रचंड ट्रेंडिंगला आले आहे. या हटके साँगमध्ये मानसी नाईक हिच्या मोहक अदा रसिकांना पहायला मिळणार आहेत. हे गाणे 7 सिरीज रेकॉर्डस् मराठी प्रस्तुत , शंतनू फुगे निर्मित आणि मनिष शिंदे दिग्दर्शित असुन डॉ. विवेकानंद सानप हे या गाण्याचे गीतकार आणि चालरचनाकार आहेत. त्याच बरोबर प्रज्वल यादव हे या गाण्याचे संगीत दिग्दर्शक आहेत व सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांनी हे गाणं गायलं असून नृत्यदिग्दर्शन राहुल माने यांनी केले आहे. तसेच या गाण्यामध्ये मानसी नाईक सोबत सचिन बक्षी हे सुद्धा झळकणार आहेत. सोशल मीडियावर या गाण्यावर अनेकांनी शॉर्ट व्हिडीओज् बनवायला सुरुवात केली आहे.
मानसीचं ‘ बाई वाडयावर या 2 ‘ हे गाणं ७ सिरीज रेकॉर्डस् मराठी प्रदर्शित झालं असून तुम्ही ते यूट्यूब वर पाहू शकता.

error: Content is protected !!