विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देणाऱ्या ” के.डी सायन्स लॅब’ चे उदघाटन

0 79

 

सेलू / प्रतिनिधी – क्लासेस मधील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे कृतीयुक्त शिक्षण मिळावे .या उद्देशाने येथील के डी क्लासेस मध्ये सुरू करण्यात आलेल्या के डी सायन्स लॅब चे उदघाटन भागवताचार्य व वेदमूर्ती नागनाथराव विडोळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ .शरद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले .

 

यावेळी केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे सदस्य जयंतराव दिग्रसकर ,डॉ .रणजित गायके ,किशोर जोशी,जेष्ठ पत्रकार नारायण पाटील ,कृष्णा काटे ,मनोज दिक्षित ,सौरभ देशपांडे,अर्थव सोनेकर,संतोष अवताडे ,गोलू पटवारी प्रशांत टकले ,भागवत दळवी ,दिनेश बोकन, संगेकर, वैभव संगई ,लक्ष्मीकांत जोशी आदींची उपस्थिती होती .यावेळी क्लासेसचे शिक्षक डॉ अमित कुलकर्णी यांनी उपस्थितांना लॅब मधील सर्व उपकरणांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना त्यांचे अभ्यासातील महत्व पटवून दिले .

 

विज्ञान हा खरं तर अत्यंत सोपा आणि विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल जागृत करणारा विषय आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आणि करिअरच्या दृष्टीनेही या विषयाचे महत्त्व आहे. मात्र देशातील शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांसाठी हा विषय कठीण आणि कंटाळवाणा होतो. याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शिक्षणामध्ये प्रयोगशाळांचा अभाव.शहरातील विद्यार्थ्यांकरीता विज्ञान विषय सोपा करून शिकविण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता तर ही परिस्थिती तर अत्यंत विदारक अशीच आहे. आजही सेलू शहरातील व तालुक्यातील जवळपास 80% टक्के विद्यार्थी विज्ञानाच्या प्रयोगशाळा विना शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विज्ञान हा महत्त्वाचा विषय पुस्तकातून वाचुन आणि पाठांतर करूनच परीक्षेत लिहिणे, हेच अभ्यासाचे स्वरूप आहे . सेलू शहरातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण मिळावे ही सामाजिक जाणीव लक्षात घेऊन के डी क्लासेस च्या वतीने या “के डी सायन्स लॅब ” ची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये इयत्ता तिसरीपासून दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रयोगांचे सुसज्जित मॉडेल विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपलब्ध केले आहेत. विद्युत निर्मिती, न्यूटनचे नियम, सौर ऊर्जा, ओहमचा नियम, प्रकाशाचे परावर्तन, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, मानवी शरीर रचना, चुंबकाचे प्रयोग, डीएनए मॉडेल असे सर्व प्रकारचे २५० च्यावर विज्ञान मॉडेल या लॅबमध्ये आहेत. केवळ प्रयोगांची नाही तर विज्ञानाच्या तज्ज्ञ शिक्षकांद्वारे मार्गदर्शनाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्याचे यावेळी के.डी क्लासेसच्या संचालकांनी स्पष्ट केले.

यावेळी के डी क्लास चे शिक्षक कालिदास जोशी ,दिलीप चव्हाण,प्रियंका पाटील ,पल्लवी उपासे ,निशिकांत पाटील यांची उपस्थिती होती .
शहरातील अनेक मान्यवर मंडळी तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी या लॅब ला भेट देऊन कौतुक केले .व समाधान व्यक्त केले .

error: Content is protected !!