एचएआरसी आयोजित ‘शिवम बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन

0 91

 

परभणी, प्रतिनिधी – येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) आणि शिवम प्रतिष्ठान घारेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने योग साधना केंद्र, परभणी येथे दि. १६ मे रोजी सकाळी १० वाजता भव्य शुभारंभ झाला आहे. एचएआरसीचे डॉ. पवन चांडक आणि डॉ. आशा चांडक यांच्या पुढाकारातून पाच दिवसांचे बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. बाल संस्कार शिबिरासाठी परिसरातील १५० हून अधिक मुलामुलींनी आनंदाने सहभाग नोंदवला.

 

दि. १६ मे रोजी सकाळी १० वाजता परभणी येथील योग साधना केंद्र येथे प्रा जयंत देशपांडे (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या हस्ते व प्रा. डॉ. शिवा आयथळ, प्रा. दिलीप राके, डॉ. दीपक महिंद्रकर, मल्हारीकांत देशमुख व डॉ दत्तात्रय मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा शुभारंभ झाला. पारंपरिक दीपप्रज्वलन ऐवजी रोपाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ झाला. शिवम प्रतिष्ठान घारेवडी येथील अनुभवी मार्गदर्शक सुहास प्रभावळे, अक्षरा प्रभावळे, आकाश कदम, राज गोंधळी, संगीता भावसार आणि अजिंक्य वास्कर शिबिर समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

 

या शिबिरात शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराड येथील अनुभवी टीमचे मार्गदर्शन सोबतचं योग, प्राणायाम, अध्यात्मिक, शारीरिक संस्काराचे धडे, विज्ञान खेळणी, चित्रकला, कागद काम, अंतर्मनाचे सामर्थ्य, अभिनय कौशल्य, निसर्ग संवर्धन, मैदानी खेळ, पथनाट्य प्रशिक्षण, विविध कौशल्यातून मुलांमध्ये कलेचे धडे सोबत सुप्तगुण विकसित करण्याचा प्रयत्न तसेच मुलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व कलागुणांचे सादरीकरण आदींचा प्रयत्न असणार आहे.

 

या शिबिरात प्रा शिवा आयथळ – लिसनिंग (श्रवनशास्त्र), प्रा दिलीप राके – विज्ञान व खगोलशास्त्र, प्रा प्रसन्न भावसार – अंधश्रद्धा निर्मूलन व विज्ञान, ज्ञानेश डाके/ रणजित कारेगावकर – सापांची ओळख व डॉ राजगोपाल कालानी यांचे ‘हॅलो डॉक्टर’ आदी मान्यवरांचे सत्र आयोजित केले असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. दि. २० मे रोजी शिबिराचा समारोप होणार असून आदरणीय इंद्रजित देशमुख (काकाजी) यांचे शिष्य ह. भ. प. स्वामिराज भिसे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरास मोठ्या संख्येने बालगोपाळांचा प्रतिसाद मिळत आहे.

error: Content is protected !!