पूर्णा शहरात अपहरण,वाटमारी,चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ

2 74

पूर्णा,दि 09 ः
स्थानिक पोलिसांचे वचक नसल्याने शहरात चोरट्यांनी चोरीचे सत्र सुरुच ठेवले असून प्रा मोहन मोरे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी 9 लाख 15 हजार रुपायची चोरी करून पुन्हा एकदा पो नि सुभाष मारकड यांना आव्हान दिले आहे.दरम्यान वाढत्या चोऱ्या मुळे नागरिकांची झोप उडाली आहे.
पूर्णा तालुक्यात तथा शहरात पोलिस निरीक्षक सुभाष मारकड यांचा गुन्हेगारीवर वचक नसल्याने शांतता सुव्यवस्था ढासळत चालली आहे. तसेच पूर्णा पोलिस ठाण्याचे बहुतांश पोलिस कर्मचारी मुख्यालयी न रहाता अपडाऊन करत असल्याचा फायदा घेत गेल्या काही दिवसा पासून गुन्हेगारी वाढली आहे. नुकतेच तालुक्यातील बरबडी पांगरा रेल्वे मार्गावरील रेल्वे विद्युतकरणाच्या पोलमधून दोन लाखाचे तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी दि 3 नोव्हेंबर रोजी चोरल्याची घटना ताजी असताना दि 4 नोव्हेंबर राजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शहरातील महावीर नगरातील माजी नगराध्यक्ष तथा प्राचार्य मोहनराव मोरे यांचे घर फोडून सोन्या चांदी चे दागदागिने आणि नगदी  चार लाख रुपये असे एकूण मिळून अंदाजे 9 लाख पंधरा हजार रु चा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. या वाढत्या चोऱ्या मूळे नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरून पूर्णेकराची झोप उडाली आहे या वाढत्या चोऱ्या रोखण्यास  स्थानिक पोलिसांनी  कोणतेच ठोस पाऊल न उचल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्हे निर्माण झाले आहे. शहरात महिलांचे अपहरण ,वाटमारी, चोऱ्या सारख्या घटनेत वाढ होत आहे या मुळे पोलिसांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्णा कडे लक्ष देण्याची मागणी नागरिकातून पुढे येत आहे

error: Content is protected !!