गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग ! लॉन्च होताच पडला LIC चा शेअर, आता काय करावे…

0 105

मुंबई – एलआयसीचा शेअर आज डिस्काउटसह लिस्ट झाला. मुंबई शेअर बाजारात तो ८६७.२० रुपयांना ८.६२ टक्के डिस्काउटसह लिस्ट झाला, याचा दरपट्टा म्हणजे इश्यू प्राइस ९४९ रुपयांना निश्चित करण्यात आला होता. यामुळे काही मिनिटात गुंतवणुकदारांना ४२ हजार ५०० कोटींचा झटका बसला. इश्यू प्राइसवर कंपनीचे मार्केट कॅप सहा लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होता पण कमकुवत लिस्टिंगमुळे त्याच ४२ हजार ५०० कोटींपेक्षा अधिकची घसरण झाली. आयपीएमध्ये किरकोळ गुंतवणुकदारांना प्रत्येक शेअरवर ४५ रुपये तर विमाधारकांना ६० रुपयांची सवलत मिळाली होती. या हिशोबाने विमाधारकांना २२ रुपये तर कर्मचाऱ्यांना ३७ रुपयांचे नुकसान झाले.

 

एलआयसीची लिस्टिंग घसरणीसह झाली आहे. मात्र त्यात समाधानाची बाब म्हणजे शेअर्स खरेदीचा जोर वाढला आहे. येत्या काळात शेअर्स खरेदी आणखी वाढल्यास स्टॉकची किंमत 900 रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. विमाधारक तसेच एलआयसीचे कर्मचारी यांना शेअर खरेदीमध्ये सूट देण्यात आली होती. विमाधारकांना प्रति शेअर मागे 60 रुपयांची तर कर्मचाऱ्यांना प्रति शेअर्समागे 45 रुपयांची सूट देण्यात आली होती. त्यामुळे जर शेअर्सची किंमत 900 पार पोहोचल्यास हे गुंतवणूकदार फायद्यात राहू शकतात.

 

गुंतवणूकदारांनी काय करावे?
एलआयसीचा शेअर घसरणीसह लिस्टिंग झाला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 8.11 टक्के तर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 8.62 टक्के घसरणीसह शेअर सूचीबद्ध झाला आहे. मात्र तरी देखील अनेक गुंतवणूकदारांना एलआयसीचे शेअर चांगला परतावा देऊ शकतात असा विश्वास आहे. याबाबत बोलताना जीईपीएल कॅपीटलचे हर्षद गाडेकर यांनी म्हटले आहे की, सध्या एलआयसीच्या शेअर्समध्ये पडझड सुरू आहे. मात्र गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी करावेत. ‘इन्वेस्ट आज फॉर कल’चे अनंत लोढा यांनी म्हटले आहे की, ज्या गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. एलआयसीच्या शेअर्समधून शॉर्ट टर्मसाठी चांगला परतावा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एक तर आपली गुंतवणूक कमी करावी अन्यथा लॉंग टर्मसाठी विचारा करावा. लॉंग टर्म गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

 

मोतीलाल ओसवाल फायनाशियल सर्व्हिसेसचे हेमांग जानी म्हणाले, एलआयसीची लिस्टिंग इश्यू प्राइस कमी झाली आहे. पण आकर्षक व्हॅल्यूशन आणि बाजारातील स्थिरता पाहात रिटेल आणि संस्थात्मक गुंतवणुकदार रस दाखवू शकतात. लिस्टिंगनंतर मोठ्या प्रमाणात पैसा लोकांच्या हाती आलीय त्यापैकी काही रक्कम पुन्हा बाजारात येऊ शकते.

 

गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण
दरम्यान गुंतवणूकदारांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल या आशेने अनेक जणांनी एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. मात्र एलआयसीचा शेअर घसरणीसह लिस्टिंग झाला त्यामुळे गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे.

error: Content is protected !!