तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या पाळीला सन्मान मिळतो का ? डॉ.सौ.आशा चांडक

0 66

परभणी,दि 11 (प्रतिनिधी)ः
“मासिक पाळीत सकारात्मक विचारसरणी ठेवा, पाळी ही काय लपविण्याची गोष्ट नाही त्यामुळे तुम्ही जिथे राहता, जिथे काम करता किंवा शाळेत जाता तिथे तुमच्या मासिक पाळीला सन्मान मिळतो का ? हा प्रश्न विचारा. नसेल तर तो सन्मान मिळायला हवा. अर्थात तुमच्या पाळीत तुमचे मूलभूत हक्क यांची पूर्तता होते का ? जसे स्वच्छ टॉयलेट, पाळीत वापरायची शोषके जसे सॅनिटरी पॅड, कप आणि तुमच्या सहकारी चा मानसिक आधार मिळायला हवा.” असे प्रतिपादन डॉ सौ आशा चांडक यांनी केले.
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज परभणी या संस्थेतर्फे दि 10 ऑगस्ट बुधवार रोजी श्रीमती रतनबाई चंद्रकांतराव सोनटक्के प्रशाला नवागड (उखळद) ,ता जि परभणी येथे मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलतांना डॉ सौ आशा चांडक यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात  इय्यता 6 वि ते 10वि तील  127 किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात डॉ सौ आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा वापर, त्याची योग्य विल्हेवाट, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस, अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय अर्थात शोषक म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले.

या समुपदेशन सत्रात 127 विद्यार्थिनींना एचएआरसी संस्थे तर्फे समुपदेशन करून सॅनिटरी पॅड व मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रकाचे वाटप केले.
तसेच श्रीमती रतनबाई चंद्रकांतराव सोनटक्के प्रशाला नवागड येथील मुलींसाठी ‘मेन्स्ट्रुपेडिया’ या मासिक पाळी विषयक मराठी कॉमिक बुक चे इयत्ता नुसार वाटप करण्यात आले. “येत्या काळात शाश्वत पर्याय म्हणून एचएआरसी संस्थे तर्फे पॅड ऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासाठी इच्छुक गरजू किशोरवयीन मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप चे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे ” संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले.

मुलींनी परखडपणे व्यक्त केल्या भावना: अनेक विद्यार्थिनींनी स्टेजवर येऊन मनमोकळेपणे आपल्या मनातील प्रश्न, शंका ना केवळ व्यक्त केल्या तर मासिक पाळी विषयीच्या विटाळ, चुकीच्या रूढी, गैरसमज विषयी परखडपणे भाष्य केले व विज्ञानवादी विचार व्यक्त केले। एचएआरसी टीमने त्यांच्या प्रश्नांचे शास्त्रोक्त उत्तराने समाधान केले।
प्रास्ताविक श्री मुख्याध्यापक श्री देवानंद आंबोरे यांनी केले। सूत्रसंचालन अहाळे यांनी केले.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेतेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक,सौ शीतल राजुरे यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, श्री बोराळकर  व जयश्री धुमाळ यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!