झरी जवळील खानापूर शिवारात आढळला इसमाचा सांगाडा

परभणी जिंतूर रोड वरील घटना

0 111

 

झरी, प्रतिनिधि – परभणी तालुक्यातील झरी जवळील खानापूर शिवारामध्ये शनिवार ७ मे रोजी सकाळी एका अनोळखी इसमाचा सांगाडा मिळून आला. सदर इसमाचा मृत्यूमागे अपघात आहे की घातपात याचा शोध पोलीस घेत आहेत. मयताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर आहे.

परभणी तालुक्यातील खानापूर शिवारात सतीश ज्ञानोबा जाधव यांच्या गट क्रमांक ७३ मधील शेतात एका अनोळखी इसमाचा अर्धवट अवस्थेतील सांगाडा शनिवारीसकाळच्या सुमारास आढळला. हि बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन ग्रामीण पोलीसांना घटनेची माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सोमवंशी, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस कर्मचारी एस डी फड, मुंढे, टेहरे, शरद पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक, ठसे पथकाला पाचारण करण्यात आले. शेत शिवारात मयताची हाडे पसरलेली होती. अनोळखी मृत्यू मागे घातपात आहे की अपघात हे तपासा नंतरच स्पष्ट होईल मयताची ओळख पटवायचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे.

error: Content is protected !!