झालं… एकदाचा मुहूर्त ठरला… मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार

0 781

औरंगाबाद – एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे गट असे दोघांचे मिळून किमान २५ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील असा अंदाज आहे. आता या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Shinde-Fadnavis cabinet expansion)

 

राज्यातील सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झालेला नाही. केवळ दोनच मंत्री संपूर्ण राज्याचा गाडा हाकत आहेत. यावरुन विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सरकारच्या अस्तित्वाबाबत ची सुनावणी सुरू असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रखडल्याचा दावाही विरोधक करत आहेत. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

 

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 29 जुलैच्या आधी मंत्रिमंडळ जाहीर होईल. मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याचं सत्तार म्हणाले आहेत. तसंच मी नेहमी खूश असतो, मंत्रिमंडळ यादीत नाव असो किंवा नसो. कारण मी उधारीवर धंदा करत नाही. मैने नगद बेचा मुझे टेन्शन नही, असं उत्तर सत्तार यांनी मंत्रीपदी तुमची वर्णी लागणार का, या प्रश्नावर दिलं.

error: Content is protected !!