जीप व कारची धडक,तीन जागीच ठार तर चार जखमी

0 821

नांदेड, गजानन जोशी – पालम ते लोहा या राष्ट्रीय मार्गावर पेठशिवणी गावानजीक डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी सुतगिरणीसमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या कार व जीपची समोरा समोर जोरदार धडक झाल्याने अपघाताची घटना २6 डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याचे सुमारास घडली आहे,या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. पेठशिवणी येथील नागरिक व प्रवाशी यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी मदत केली आहे.

पेठशिवणी नजिकच्या मार्गावर जीप क्रमांक एम.एच २२ ए.एम ७३३३ व कार क्रमांक एमएच ०४ ई.टी २७३४ ही दोन्ही वाहने रस्त्याने जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटून एकमेकांना समोरा समोर धडक झाली आहे. या अपघातात दोन्ही वाहनाचे समोरील बाजू चक्काचूर झाल्या आहेत आतील तीन प्रवाशी जागेवरच ठार झाले असून ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले आहेत,नागरिकांनी धाव घेत पालम शहरातील रुग्णवाहिका पाचारण करून जखमिंना नांदेड व पालम येथे पाठवले आहे मयत झालेल्या प्रवाशी सिडको नांदेड येथील रहिवासी असल्याची माहिती मिळते मयत नावे अनिल जहागीरदार ५०, लक्ष्मीकांत जहागीरदार८०,शांताबाई जहागीरदार ७५ गंभीर जखमींची नावे समजू शकली नाहीत. ओव्हरटेकच्या प्रयत्नात अपघातग्रस्त कारचालक हा समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या क्रुझर जीपवर जाऊन आदळला आहे यात कार मधील तीन जण जागेवरच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे तर जीपमधील ३ जणांना जबर मार लागला आहे,कारचा या अपघातात चेंदामेंदा झाल्याने आतील मृतदेह काढणे अवघड झाले असून कारची मोडतोड करून मयतांचे पार्थिव बाहेर काढले जात होते,कार मधील मयत प्रवासी अंबाजोगाई ते नांदेड प्रवासात असल्याची माहिती मिळते.

error: Content is protected !!