सेलु क्रांती चौकात कारगिल विजय दिवस साजरा

0 148

 

सेलू,दि 27 (प्रतिनिधी)ः
शहरातील क्रांती चौक परिसरातील मशाली जवळ 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला . यावेळी शहरातील माजी सैनिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या वतीने अमर जवान स्तंभास व मशालीस पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती पेटवून अभिवादन करण्यात आले तसेच आजादी का अमृत महोत्सव निमित्त आर पी एफ नांदेड च्या जनजागृतीपर देशभक्तीपर गीत व भारत मातेच्या रक्षणाची तसेच रेल्वे सुरक्षाची माहितीचा रथाचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास जे पी शर्मा, रमेश काकडे ,रेल्वे पोलीस सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक संजय सुरेवाड, सखाराम महाजन ,पत्रकार दिलीप डासाळकर , सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, सतीश जाधव, संजय सानप, तीडके , मंजुषा कुलकर्णी, दिपक बनसोडे, खान शाहेद, भिमराव मगरे,राहूल कांबळे, आदि उपस्थित होते .
या प्रसंगी माजी सैनिक संघटणेचे लक्ष्मण शेरे ,विठ्ठल ठाकुर, संजय रोडगे, गोरखनाथ राऊत ,प्रकाश देउळगावकर , सदाशिव पौळ, रघुनाथ देशमुख, विठ्ठल शिंदे,रामचंद्र कलालडे, नागेश कुलकरणी भगवान वाघ ,रामचंद्र पुरभे, शिवाजीराव झोल, अंबादास केवारे , राधाकिसन केवारे, मुन्नाभाई,मधुकर सोनवणे,रौफ भाई,

error: Content is protected !!