लालबावटा कामगार कार्यशाळा संपन्न

0 32

परभणी,दि 02 ः
लाल बावटा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने बी रघुनाथ सभागृह येथे आज कामगार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
जिल्ह्यातील पोषण आहार कामगार व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यात समन्वय निर्माण व्हावा त्याच बरोबर शासनाच्या नविन आदेशाची माहीती कामगारांना व्हावी आणि कामगारांच्या प्रश्नांची जाणीव अधिकाऱ्यांना व्हावी या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई किर्तीकुमार बुरांडे व उदघाटक म्हणून शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.निलेश दळवे, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, देवीदास शिंपले उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सचिव पंढरीनाथ मुळे, नामदेव लोखंडे, इंद्रजित आहेर, आंबरी बुवा पुरी, सोपानराव बनसोडे, देवीदास मस्के, मनोहर काळे, यांनी प्रयत्न केले सुत्रसंचलन तुकाराम भुजबळ यांनी आभार देवीदास मस्के यांनी मानले

error: Content is protected !!