LPG Price hike : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

0 172

नवी दिल्ली – वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे घरगुती 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे ( gas cylinder) दर वाढवण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पन्नास रुपयांच्या वाढीसह घरगुती सिलिंडरचे (cylinder) दर आता 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच इथून पुढे एका सिलिंडरसाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडरचे दर महागल्याने गृहिनीचे बजेट कोलमडण्याची शक्यात आहे.

पेट्रोल-डिझेल, खाण्यापिण्याच्या, वापरायच्या अनेक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. असं असताना आता सर्वसामान्यांना आणखी एक फटका बसणार आहे. आज शनिवारी 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरचे दर (LPG Gas Cylinder Price Hike) वाढले आहेत. घरगुती LPG Gas Cylinder च्या किमतीत 50 रुपये प्रति सिलेंडर वाढ करण्यात आली आहे. ही वाढ आज शनिवार 7 मे 2022 पासून लागू करण्यात आली आहे.

 

राजधानी दिल्लीत 14.2 किलोग्रॅम डॉमेस्टिक LPG सिलेंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. मागील वेळी 22 मार्च रोजी घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपये वाढ झाली होती. तर एप्रिलमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. एका आठवड्यापूर्वी 1 मे रोजी सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर वाढवले होते. त्यावेळी प्रति सिलेंडर 102.50 रुपये किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्याशिवाय त्याआधी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

error: Content is protected !!