लासलगावला २०२२ चा श्रमण संघाचा चातुर्मास घोषित

0 138

 

निफाड, रामभाऊ आवारे – लासलगाव तालुका निफाड येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २०२२ चा श्रमण संघाचा चातुर्मास राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषींजी म.सा यांचे कृपापात्र शिष्य ‘आनंदकूल, कमलदिवाकर ‘ महाश्रमण ‘ पु. श्री कुंदन ऋषींजी म. सा व युवाचार्य महेंद्र ऋषींजी म. सा यांच्या आज्ञानुवर्तीनी प. पु. साध्वी डॉ. मुक्तीप्रभाजी म. सा एवम अरिहंत प्रिया साध्वी डॉ. दिव्याप्रभाजी म. सा यांच्या सुशीस्या वर्तमानच्या वातसल्यमूर्ती साध्वी प. पु. दर्शनप्रभाजी म. सा. यांच्या आज्ञानुवर्तिनी साध्वी प. पु. योगसाधनाजी म. सा. आणि साध्वी प. पु. सफलदर्शनाजी म. सा आदी साध्वीवृंद याचा चातुर्मास जाहीर झाला आहे अशी माहिती संघपती नितीनजी जैन व भाजपा जैन प्रकोष्ठ जिल्हा उपाध्यक्ष मनीष चोपडा यांनी दिली आहे.

यावेळी चातुर्मासाची आज्ञा घेताना श्रमण संघ लासलगाव चे पदाधिकारी संघ पती नितीनजी जैन, अध्यक्ष डॉ विजयजी बागरेचा, रमेशजी आब्बड भाजपा जैन प्रकोष्ट जिल्हा उपाध्यक्ष मनीषजी चोपडा, गणेशजी कांकरिया ,अशोकजी मुनोत, मनोजजी शिगी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!