लासलगाव बाजार समितीत शेतमालाची १ कोटी १ लाख क्विंटलची विक्रमी आवक होऊन १६९५ कोटींची उलाढाल-सभापती सौ सुवर्णाताई जगताप

0 240

 

 

निफाड, रामभाऊ आवारे – आशिया खंडातील सर्वात नावाजलेली बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कडे पाहिले जाते. सर्वात जास्त आवक व सरासरी मध्ये सर्वाधिक भाव मिळवून देणारी बाजार समिती अशी गणना लासलगाव बाजार समितीची शेतकर्यांमध्ये आहे.लासलगाव बाजार समितीत कांद्याबरोबर धान्य,भाजीपाला, टोमॅटो, डाळींब आदी मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजार समितीच्या आवारात देखील कमी पडू लागले आहे. मका व सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात येथे पाहायला मिळत आहे.चवीला उत्कृष्ट असलेला जीआय मानांकन मिळालेला लासलगाव चा कांदा जगातील ७४ देशात निर्यात केला जातो.देशाला कांदा निर्यातीतून देखील मोठे परकीय चलन मिळत आहे.एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या आर्थिक वर्षात देशाला कांदा निर्यातीतून २९७३ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.

@मागील ६ वर्षातील शेतमाल आवक आणि उलाढाल-
सन २०१५-१६ -४० लाख ७६ हजार क्विंटल -५३२ कोटी
सन २०१६-१७ -५३ लाख ८० हजार क्विंटल-४१७ कोटी
सन २०१७-१८ -६८ लाख ८२ हजार क्विंटल-१०९८ कोटी
सन २०१८-१९ -७६ लाख ९२ हजार क्विंटल -६४३ कोटी
सन २०२०-२१ -८१ लाख ४३ हजार क्विंटल -१३१४ कोटी
सन २०२१-२२ -१ कोटी १ लाख ६२ हजार क्विंटल -१६९५ कोटी

@@मागील ५ वर्षातील कांदा उलाढ़ाल
सन २०१६-१७ -२३६ कोटी
सन २०१७-१८ -८३१ कोटी
सन २०१८-१९ -४१६ कोटी
सन २०२०-२१ -९३९ कोटी
सन २०२१-२२ -१३०५ कोटी.

@@ स्थापनेपासुन 75 वर्षाच्या कालखंडात लासलगांव बाजार समितीत अमावस्येला कांदा, भुसार व तेलबिया ह्या शेतीमालाचे लिलाव बंद असायचे.दिनांक १० जुन २०२१ पासुन अमावस्येला कांदा लिलाव चालु झाले.
अमावस्या व ब-याचशा सार्वजनिक सुट्ट्या कमी केल्याने ६० दिवस जास्त लिलाव चालु राहीले.सन २०२१-२२ मध्ये अमावस्या व इतर सार्वजनिक सुट्ट्या कमी केल्याने सदर सुट्ट्यांचे दिवशी कांद्याची १३,५२,०८९ क्विंटलची आवक झाली.

@ चालु वर्षी लासलगांव बाजार समितीचे सर्व बाजार आवारांवरील सन 2021-22 ची सर्व शेतीमालाची
एकत्रीत आवक 1,01,62,385 क्विंटल
तर किंमत 16,95,22,80,619/- रुपये
पैकी कांदा आवक 85,34,261 क्विंटल
तर किंमत 13,05,53,66,830/- रूपये

@ मागील वर्षी लासलगांव बाजार समितीचे सर्व बाजार आवारांवरील सन 2020-21 ची एकत्रीत आवक 81,43,899 क्विंटल तर किंमत 13,14,80,98,146/- रुपये पैकी कांदा आवक 63,44,658 क्विंटल तर किंमत 9,39,22,79,136/-

बाजार समितीत पारदर्शक आणि विश्वासार्ह कामकाजामुळे शेतकऱ्यांची लासलगाव बाजार समितीला पहिली पसंती असते. शेतकऱ्यांचा लासलगाव बाजार समितीवर विश्वास असल्याने फळे आणि भाजीपाला केंद्राने नियमन मुक्त असूनही शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात लासलगाव बाजार समितीत होत आहे.रोख चुकवती, जलद वजनमाप, पारदर्शक व्यवहार यामुळे शेतकरी लासलगाव बाजार समितीला प्राधान्य देतात .यामुळेच लासलगाव बाजार समितीने सन २१-२२ या आर्थिक वर्षात १६९५ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.शासकीय निर्देशांची अंमल बजावणी करून व व्यापारी वर्गाशी समन्वय साधून जास्तीत जास्त दिवस कामकाज केले. यामुळेच उलाढाल वाढली आहे.
सौ सुवर्णा जगताप सभापती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.

error: Content is protected !!