लासलगाव- विंचूर १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास निधी मंजूर

0 124

 

निफाड,दि 12 (प्रतिनिधी)ः
ऐन उन्हाळ्यात लासलगाव सारख्या महत्त्वपूर्ण बाजारपेठेच्या शहराला सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना सोळा गाव पाणीपुरवठा समितीचे दुरुस्तीच्या कामासाठी यापूर्वी दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी शासनाने १७ कोटी ५४ लक्ष निधी मंजूर केला होता परंतु सदरच्या अंदाजपत्रकात च्या किंमतीत तफावत होत असल्याने सुधारित अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते सदर अंदाजपत्रकास पालकमंत्री छगन भुजबळ यांचे प्रयत्नातून शासनाने दिनांक ११/५/२०२२ रोजी 20 कोटी १० लक्ष २५ हजार इतका निधी मंजूर केलेला आहे अशी माहिती लासलगाव ग्रामपालिका सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली आहे.नामदार छगनरावजी भुजबळ यांनी लासलगाव विंचूर सोहळा गाव पाणीपुरवठा योजना दुरुस्ती कामाला वाढीव निधी मंजूर केल्यामुळे या दुरुस्तीच्या कामास लवकरात लवकर सुरुवात होऊन 16 गाव चा व लासलगाव चे नागरिकांचा पाणी प्रश्न कायमचा संपुष्टात येणार आहे अशीही माहिती लासलगाव चे सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली.

error: Content is protected !!