चिकलठाणा येथे समृद्धी महामार्गाच्या रस्त्याच्या मोजणी कार्यक्रमाचा शुभारंभ

0 81

 

सेलू, प्रतिनिधी – तालुक्यातून नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड जालना महामार्गावर बुधवार ५ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.४ जानेवारी रोजी या रस्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी या रस्त्यावरील चिकलठाणा येथे होणाऱ्या नियोजित मोजणीस विरोध करत मागण्या मान्य केल्या शिवाय मोजणी होऊ देणार नाही. अशी भुमिका घेतली होती.

शेतकरी संघटनेचे अमृत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विजय खरात, दत्तराव भुजबळ, दीपक मानमोडे, प्रदीप खरात, चक्रधर पौळ सह शेतकर्‍यांनी विरोध केला. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी शेतकऱ्यांची मागणीच्या संदर्भात वरिष्ठाकडे कल्पना दिली या नंतर महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे उपविभागीय अधिकारी यांनी ४ जानेवारी रोजी दिलेल्या विशेष पत्रामुळेआणि प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकामुळे शेतकऱ्यांनी शेतातुन जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या रस्त्यांची मोजणी होऊ दिल्याने प्रशासनाच्यावतीने सेलू तालुक्यातील चिकलठाणा परिसरात मोजणीस सुरुवात करण्यात आली आहे. सेलू तालुक्यातील ८ गावामधील २५० हेक्टर जमीन या महामार्गाच्या रस्त्याच्या प्रकल्पात जाणार आहे.

error: Content is protected !!