महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन

1 41

माजी फुटबॉलपटू पेले (Pele) यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. मागील काही महिने ते कर्करोगाशी लढा देत होते, पण गेले काही दिवस त्यांची अवस्था बिकट झाली होती. ज्यानंतर अखेर आता त्याचं निधन (Pele Demise) झालं आहे.

 

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले ( संपूर्ण नाव- एड्सन अरांतेस दो नासिमेंतो) यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षापासून ते कॅन्सरशी लढा देत होते. त्यांच्यावर साओ पाउलोच्या अलबर्ट आइन्स्टाइन रुग्णालयात उपचार सुरू होते.पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो (Kely Nascimento) हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ”आम्ही जे काही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, Rest in Peice असं कॅप्शन लिहित केलीने सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर जगभरातील फुटबॉलप्रेमी कमेंट करत असून सर्व स्तरातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

 

फुटबॉल जगतात अनेक फुटबॉलर्सचं विश्वचषक जिंकणं स्वप्न असतं, अशामध्ये तब्बल तीन वेळा विश्वचषक विजेतेपद पटकावणारा एकमेव खेळाडू असलेले पेले अखेर हे जग सोडून निघून गेले आहेत. त्यांची कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. त्यांनी १९५८, १९६२ आणि १९७० अशी तीन विजेतेपद मिळवली आहेत.

error: Content is protected !!