जीवन मूल्य शिकविणारी कार्यशाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना-प्रा. डॉ. रमाकांत कसपटे

0 37

 

 

पुणे, प्रतिनिधी – निसर्ग,पर्यावरण हा मानवी जीवनाचा पाया आहे.  निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे, त्या बदल्यात  मानवाने निसर्गाचे संवर्धन व संरक्षण करणे गरजेचे आहे. हे महत्वाचे जीवन मूल्य राष्ट्रीय सेवा योजना शिकवते असे प्रतिपादन प्रा. डॉ. रमाकांत कसपटे यांनी केले.

dr. kendrekar

 

भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश कला व वाणिज्य महाविद्याल, भोसरी. राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे  आयोजित केलेल्या ‘ 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त ‘महाविद्यालयीन जीवन व राष्ट्रीय सेवा योजना’ या विषयावर डॉ. कसपटे यांचे व्याख्यान आयोजित केले होते  मानवता, श्रमप्रतिष्ठा, वाचन संस्कृती, आई-वडील व गुरुजनांचा आदर, सामाजिक बांधिलकी ह्या जीवन मूल्यांचा  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विसर पडत चाललेला आहे. ही मूल्य राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे व जोपासण्याचे कार्य  करते असे असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ.अशोक कुमार पगारिया होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समर्पण,श्रद्धा,ज्ञान,मानवतेची सेवा, ही मूल्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमध्ये  दिसून येतात असे प्रतिपादन केले. “मानवतेची सेवा हीच ईश्वर सेवा” या उक्तीप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कार्य करावे असे आव्हान केले. रासेयो विशेष शिबिरात  महाविद्यालयीन विद्यार्थी समाजासाठी भरीव योगदान देतात असे मत डॉ.अशोक कुमार  पगारिया सरांनी व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या  विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुधाकर बैसाणे,रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. स्वाती वाघ, सूत्रसंचालन  प्रा. विभा ब्राह्मणकर, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रा. सदाशिव कांबळे यांनी केले. यावेळी डॉ. विजय निकम, प्रा.सचिन पवार, प्रा. रुपाली आगळे, डॉ.हनुमंत शिंदे, प्रा.प्रवीण मस्के  प्रा. महालक्ष्मी शिरसाट, प्रा. पांडुरंग भास्कर, प्रा. उमेश लांडगे प्रा. प्रशांत रोकडे, राजेश कुंभार, सारिका बेलदौर, व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!