श्रीक्षेत्र नैताळे येथे आज श्री मतोबा महाराजांची महापुजा उत्साहात

0 78

रामभाऊ आवारे
निफाड,दि 17 ः
नाशिक औरंगाबाद रोड वरील श्री क्षेत्र नैताळे येथील ग्रामस्थाचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्री मतोबा महाराज यांची महापुजा दरवर्षा प्रमाणे याही मोठ्या उत्साहात आज शासनाचे कोव्हिड १९ चे संदर्भातील नियम पाळून सकाळी ८-०० वाजता करण्यात आली या धार्मिक कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते
नाशिक- औरंगाबाद या महामार्गावर असलेल्या श्री क्षेत्र नैताळे येथे आज श्री मतोबा महाराज यांची देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून पौष पोर्णीमेच्या निमीत्ताने जिल्हा परिषद अध्यक्ष  बाळासाहेब क्षीरसागर,आमदार दिलीपराव बनकर जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर ,भा.ज.पा.नेते यतीन पाटील कदम व ओझरच्या माजी सरपंच जान्हवी कदम ,मच्छिंद्र वाळुंज व संध्या वाळुंज यांच्या हस्ते महापुजा उत्साहात शासनाचे कोव्हिड १९चे नियम पाळून सकाळी ८-०० वाजता करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निफाडचे माजी आमदार अनिल पाटील कदम, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे , मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक सचिन पिंगळे, प्रणव दादा पवार, लासलगाव बाजार समितीच्या उपसभापती प्रितीताई बोरगुडे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे ,निफाड पंचायत समीतीचे माजी सभापती सुभाष कराड ,जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर , लासलगाव बाजार समीतीचे संचालक वैकुंठ पाटील , नि.सा.काचे माजी संचालक रावसाहेब रायते ,वनसगाव सोसायटीचे चेअरमन संदिप गारे , निमगाव वाकडाचे सरपंच मधुकर गायकर ,मोहन खापरे, संजय घायाळ, राजेंद्र कुटे ,भिमराज काळे , हे उपस्थित होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी लसीचे दोन्हीही डोस घेतलेले असावे.गर्दी न करता भाविकांनी दर्शन घ्यावे असे आवाहन श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले..
ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल फेटा देऊन सत्कार केला.महापुजा यशस्वीतेसाठी देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशिल होते.

महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या कोव्हीड१९ च्या आपत्ती व्यावस्थापनाच्या नियमावलीनुसार निफाड पोलिस ठाण्याकडून श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत व्यावस्थापनाला नोटीसा देऊन गर्दी न करण्याच्या व यात्रोत्सव न भरविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत

 

error: Content is protected !!