नांदेड जिल्हातील शिक्षकांचे वेतन दिवाळी पुर्वी करा-शिक्षक काँग्रेसचे मागणी

0 24

लोहा,दि 19 (प्रतिनिधी)ः
नांदेड जिल्हातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या मागण्यासाठी शिक्षक काँग्रेसच्या वतीने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी व शिक्षकांचे हित जोपासण्यासाठी सतत अग्रेसर असलेली महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हा परिषदेचे प्रा. शिक्षणाधिकारी शिक्षकांच्या पुढील प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले असुन यात दर महीण्याचा पगार हा शेवटच्याआठवड्यातच होत असतो म्हणुन दिपवाळी हा सन महत्वाचा आसल्यामुळे माहे ऑक्टोबर २०२१चे वेतन १ नोव्हेंबर रोजी करावे,थकीत डि.ए.पगारी बरोबरच देण्यात यावा चटोपाध्याय व निवड श्रेणीचे आदेश निर्गमित करावे, सेवानिवृत्त शिक्षकांचे थकित एरिअर्स मंजूर करावे , महाराष्ट्र दर्शन चे आदेश निर्गमित करण्यात यावेत,कोविड १९ काळातील सेवानिवृत्त शिक्षकांचे थकित पगार आदा करण्यात यावा,वीत विभागास दर महिन्याचे पगारी जीपीस चे २०२०-२१ चे शेड्युल पाठविण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन देण्यात आहेत..या निवेदनावर शिक्षक काँग्रेसचे राज्यकोषाध्यक्ष प्रकाश मुंगल मराठवाडा अध्यक्ष विठुभाऊ चव्हाण, प्रकाश ढेपे सर,बाबुराव कैलासे जिल्हासल्लागार,जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कल्यानकर व जिल्हा प्रवक्ता एम.ए.शेख सर अदीच्या स्वाक्षर्‍या आहेत.

error: Content is protected !!