शेतकरी कंपनी चळवळीत वालमिकेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन दर्जेदार

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळातील अधिकाऱ्यांच्या पथकाकडून गुरुवारी झाली पाहणी

2 26

पाथरी, प्रतिनिधी – कंपनीची उभारणी व उपयोजनात्मक बळकटीकरण या शेतकरी कंपनी चळवळीत पाथरी तालुक्यातील वालमिकेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी देवनांद्रा येथील व्यवस्थापन दर्जेदार असल्याचे मत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी येथील पाहणी केल्यानंतर व्यक्त केले आहे.

 

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या पथकातील राज्य व्यवस्थापक तथा स्मार्ट प्रकल्प शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ प्रशांत चासकर ,बाजार जोडणी व व्यवस्थापन तज्ञ कुशाग्र मुंगी,राज्य व्यवस्थापक व नाबार्ड समन्वयक सादिक मनेरी यांनी २९ डिसेंबर रोजी देवनांद्रा येथील वाल्मिकीश्वर शेतकरी कंपनीस भेट देऊन पाहणी केली.यादरम्यान कंपनीचे अध्यक्ष अदित्य नखाते यांनी प्रारंभी त्यांचे स्वागत करून व्यवस्थापना बाबतची माहिती दिली.

 

 

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तात्कालिन सभापती अनिलराव नखाते यांची उपस्थिती होती.यावेळी जागतिक बँक अर्थ सहाय्यीत स्मार्ट व पोकरा या प्रकल्पांच्या मदतीने वालमिकेश्वर शेतकरी कंपनीने गळीतधान्य, तृणधान्ये व कडधान्ये या पिकांच्या पुरवठा साखळ्या विकसित करण्यासाठी गोदाम उभारणी नंतर शेतकऱ्यांसाठी गोदाम पावती योजनेची माहिती या पथकातील अधिकारी यांनी दिली.याशिवाय राज्य व्यवस्थापक प्रशांत चासकर यांनी गोदाम व्यवस्थापन ,वखार विकास व नियामक प्राधिकरण सलग्न प्रक्रिया व शेतकरी सभासद यांची भुमीका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर कुशाग्र मुंगी,सादिक मनेरी विक्री व्यवस्थापनाबाबत तपशिलवार माहिती दिली.

error: Content is protected !!