शिंदे गटातील उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे रेल्वेस्थानकावर जोरदार स्वागत

0 24

परभणी,दि 01 ः
परभणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे यांनी मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांना समर्थन देऊन शिंदे गटात प्रवेश केला.त्यांचे परभणी रेल्वे स्थानक येथे आगमन होताच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी  ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले.
.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीनंतर उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे यांच्या समर्थनाचे स्वागत करत संपूर्ण सहकार्य राहील असे सांगून जिल्ह्यातील शिवसैनिक व परभणीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासित केले. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी भेटीनंतर सांगितले की मार्चमध्ये मी परभणीला आलो होतो परभणीतील जनतेचे प्रश्न व शिवसैनिकांच्या समस्या मला अवगत आहेत त्यामुळे आपण निर्भयपणे कामाला लागा, जनतेच्या समस्या घेऊन मुख्यमंत्री महोदयांना भेटत राहा, त्याचबरोबर मी लवकरच परभणीला येईल असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री शिंदे  व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आश्वासनानंतर उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे यांनी इथून पुढे नव्या जोमाने परभणीतील जनतेसाठी व शिवसैनिकांसाठी काम करण्याचे ठरविले आहे. जनतेने आपले आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्यावे अशी विनंती केली.
याप्रसंगी बोलताना माणिक पोंढे यांनी सांगितले की प्रवेश घेते वेळेस मी कोणालाही बोललो नाही पण प्रवेश झाल्यानंतर माझ्या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना समर्थन देतील.
माणिक पोंढे यांच्यासह माजी उपशहर प्रमुख शेख शब्बीर, माझी उपविभाग प्रमुख संजय चोपडे, प्रभाग प्रमुख मोहन टाक व तसेच शाखाप्रमुख माऊली खूपसे, बाळासाहेब जाधव आणि सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन आदी यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे.

error: Content is protected !!