कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात मराठी लेखन कौशल्य विकास उपक्रम

0 33

परभणी, प्रतिनिधी – कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय,परभणी मराठी विभागाच्या वतीने उत्स्फूर्त मराठी लेखन कौशल्य विकास उपक्रम कला शाखेच्या प्रथम वर्षातील ऐच्छिक मराठी विषयाच्या विद्यार्थिनींसाठी घेण्यात आला.

dr. kendrekar

 

हा उपक्रम वर्षभर राबविला जाणार असून विद्यार्थिनींना ऐनवेळी वर्गात विषय देण्यात येईल या उपक्रमाची सुरुवात दि.१४ सप्टेंबर २०२२ पासून करण्यात आली आहे.

 

१४ सप्टेंबर रोजी लघुकथा अतिथी देवो भव, रूपक कथा मोत्याचे पीक, नवकथा किडलेली माणसं या कथांचा आशय लेखन उपक्रमात. ११ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत आपले उस्फूर्त लेखन कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला.

 

या उपक्रमात कु.तन्वी स्वामी,प्रथम.कु.अंकिता दिलीपराव दुधवडे, व्दितीय.कु.प्रियंका पदमकुमार अंबेकर, तृतीय. क्रमांकाच्या मानकरी ठरल्या प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. प्रसंगी विद्यार्थिनींना मराठी विभागाचे प्रा. अरुण पडघन, डॉ.आशा गीरी यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!