एमपीएससीची मेगा भरती, ८ हजार १६९ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार

0 63

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदांसाठी ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ची जाहिरात एमपीएससीने शुक्रवारी प्रसिद्ध केली.त्यानुसार गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा २ सप्टेंबरला, तर गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा ९ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपीक-टंकलेखक अशा एकूण ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!