आखाडा बाळापुर पोलीस स्टेशन मध्ये दर्पण दिन साजरा

0 108

आखाडा बाळापूर,दि 06 (प्रतिनिधी)ः
आखाडा बाळापूर येथे पोलिस स्टेशन च्या वतीने दर्पण दिन साजरा करण्यात आला.
मराठी पत्रकार दिना निमित्य पाहिले मराठी वर्तमानपत्र दर्पण नावाने चालू करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर याना अभिवादन करण्यात आले.
ठाणेदार पी.सी.बोधनापोड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . सर्व सर्व पत्रकार बांधवांचा बोधनापोड यांनी पोलीस स्टेशन च्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.या वेळी पत्रकार सर्वश्री विष्णू आहेर,रमेश कदम,शेख फारुख गिरगावकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पवार,स्थानिक पत्रकार संघ अध्यक्ष राम हेंद्रे,विट्ठल पंडित, प्रकाश कोकट्वार .मधुकर चेटप,प्रशांत सूर्यवंशी ,गजानन चव्हाण,आतिक डोंगरगावकर,शंकर मूलगीर, आनंद बलखंडे, चंद्रकांत धुळे,संजय हापसे ,बिट जमादार बाभळे, पो.को. पवार.जाधव.आदींची उपस्थितो होती.

error: Content is protected !!