आमदार डॉ.राहुल पाटील म्हणाले… ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही

0 43

परभणी,दि 14 ः
परभणी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील विकास कामांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आजपर्यंत मंजूर करून आणला असून त्याअंतर्गत मतदार संघातील अनेक गावात सिमेंट रस्ते, नाल्या, नदीवरील पूल, सामाजिक सभागृह आदी कामे प्रगतीपथावर आहेत़ या पुढील काळात मतदार संघात पांदन रस्ता निर्मितीवर भर देण्यासह नागरिकांच्या मागणी नुसार ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली़
परभणी तालुक्यातील मटकºहाहाळा येथील सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा शनिवार, दि़१३ रोजी आ़डॉ़पाटील यांच्याहस्ते पार पडला़ यावेळी ते बोलत होते़ पुढे बोलताना आ़डॉ़पाटील म्हणाले की, अनेक वर्षांपासून मटकºहाळा येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी कुठलीही सुविधा नसल्याने आपल्याकडे सभागृह उभारणीची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती़ या मागणीची दखल घेत १० लक्ष रूपयांचा निधी सभागृहाच्या निर्मितीसाठी मंजूर करून घेतला़ तसेच या निधीतून सभागृहाचे काम पूर्ण करून आज लोकार्पण करताना ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत असल्याचे आ़डॉ़पाटील यांनी सांगितले़
याप्रसंगी युवासेना शाखा व ग्रामस्थांच्या वतीने आ़डॉ़पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला़ यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, साहेबराव गरुड, बाजार समिती सदस्य संदीप झाडे, दिनेश बोबडे, अरविंद देशमुख, संग्राम जामकर, बाबु फुलपगार, शिवाजीराव गरुड, भागवत गरुड, युवासेना शाखाप्रमुख श्रीराम गरुड, गोपाळ गरुड, माऊली गरुड, सुभाष गरुड, नामदेव शाहुराव गरुड, गोविंद गरुड, भगवान गरुड, विनायक गरुड, बालासाहेब गरुड, पवन चोपडे, कुंडलिक गरुड, माऊली गरुड आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़

error: Content is protected !!