आमदार कपील पाटलांचा सत्यजित तांबेंना पाठिंबा

0 33

 

शिक्षक लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला आहे. आज सुधीर तांबे यांनी कपिल पाटील यांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा द्यावा अशी विनंती केली होती. या बैठकीत सुधीर तांबे हे कपिल पाटील यांच्यासोबत सहभागी होते.

बावीस वर्षांपासून सार्वजनिक जीवनात

सत्यजित तांबे म्हणाले, चांद्यापासून बांद्यापर्यंत मित्र जमवण्याचे काम मी गत बावीस वर्षांपासून केले. कपिल पाटील माझ्यासाठी विधानसभेचा मतदारसंघ शोधत होते. परंतु राजकारण असते गत चार पाच दिवसांत खूप राजकारण झाले. त्यावर आम्ही योग्यवेळी योग्य बोलूच.

प्रश्न तडीस नेणार

सत्यजित तांबे म्हणाले, माझे वडील सुधी तांबे यांनी सभागृहात शिक्षकांसाठी आवाज उठवला. शिक्षकांच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा होते. परंतु आकडे मोठे दिसले की, अर्थमंत्री घाबरून जातात. पण देशातील तीन राज्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवले. येणाऱ्या काळात प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न आम्ही करू.

भांडण्याची वेळ आली तर भांडणार

सत्यजित तांबे म्हणाले, येत्या काळात आपल्याला एकत्र राहून काम करावे लागणार आहे. सरकारवर दबावगट निर्माण करावा लागणार आहे. खांद्याला खांदा लावून उभे राहू. जिथे बोलवाल तिथे येऊ. वडील सुधीर तांबेंच्या मागे जी ताकद लावली ती ताकद माझ्यासाठी लावा. कपिल पाटील यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो. मी वचन देतो. कुठलाही प्रश्न असो आणि कुणाविरुद्धही भांडण्याची वेळ आली तर भांडेल.

सुधीर तांबेंच्या प्रयत्नांना यश

शिक्षक लोकभारती संघटना कपिल पाटील यांची असून संघटनेचा पाठिंबा सत्यजित पाठिंबा मिळाला. त्यामुळे तांबेंना पाठबळ वाढले असून नाशिक पदवीधर निवडणूक आणखीनच रंगतदार होईल अशी आशा आहे. आजच्या पत्रकार परिषदेत सुधीर तांबे हे कपिल पाटील यांच्यासोबत दिसले आहेत. त्यामुळे सुधीर तांबेंच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाल्याची चर्चा आहे.

शिक्षकाचे प्रश्न मांडले

सुधीर तांबे म्हणाले, तीन निवडणूक लढवताना मला सर्व शिक्षक, संघटनांनी मला मनापासून पाठिंबा दिला होता. माझ्या वाटचालीत शिक्षकांनी जी साथ केली त्यात कृतज्ञतेची भावना आहे. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत. कपिल पाटील साक्षीदार आहेत. विधीमंडळात मी शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले आहेत.

सुधीर तांबे म्हणाले,

काॅंग्रेसची तांबेंविरोधात आक्रमक भूमिका

नाशिक पदवीधर मतदारसंघच्या निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्याविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली. पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर करून आणि एबी फॉर्म देऊनही सुधीर तांबे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. तसेच मुलाच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

तांबेंच्या माघारीनंतर नाट्य

सुधीर तांबे यांना काॅंग्रेसने उमेदवारी देवूनही त्यांनी ऐनवेळी युटर्न घेतला. मुलासाठी त्यांनी माघार घेतल्यानंतर स्वत:च्या मुलाच्या उमेदवारीलाही पाठिंबा दिला आहे. यावर पटोले यांनी संताप व्यक्त करीत पक्षासोबत दगाफटका केला असेही वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. सत्यजित तांबेंनी भाजपला पाठिंबा मागू असे म्हटले होते. त्यानंतर भाजपला पाठिंबा आपण मागितला नाही अशी स्पष्टोक्ती सुधीर तांबेंनी दिली होती. त्यानंतर आज मात्र, सुधीर तांबेंनी शिक्षक लोकभारतीचा पाठिंबा मिळवला आहे.

error: Content is protected !!