मनसेचे उपाध्यक्ष अतूल वांदीले राष्ट्रवादीत,मुंबईत झाला प्रवेश सोहळा

0 24

दशरथ ढोकपांडे
हिंगणघाट,दि 13ः

मनसेचे उपाध्यक्ष अतूल वांदीले यांनी मनसेला जयमहाराष्ट्र करत गुरुवारी (दि.13) मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
मनसेच्या स्थापनेपासून वांदुले हे मनसेत होते.कट्टर मनसैनिक अशी त्यांची ओळख आहे.परंतु मागील काही दिवसापासून ते मनसेत नाराज होते.अखेर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्या उपस्थित त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी  प्रदेशध्यक्ष जयंत पाटील , राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री बनसोडे, आमदार संदीप शीरसागर, माजी केंद्रीय मंत्री, वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोध मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी अतूल वांदीले यांचे भाषण देखील झाले. यावेळी अतूल वांदिले यांच्या सोबत मनसेच्या प्रमुख 28 कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

error: Content is protected !!