MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; वयोमर्यादा पार केलेल्यांना एमपीएससीची आणखी संधी

एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

0 310

 

मुंबई – MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना राज्यसरकार दिलासा देणार आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

shabdraj reporter add

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्ता भरणे म्हणाले, दोन वर्ष कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी अशी मागणी होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. एक वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

दोन वर्ष कोरोनामुळे एमपीएससीच्या. परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी अशी मागणी होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे आता एक वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे

 

error: Content is protected !!