नाना पटोले यांनी केले कॉंग्रेसमध्ये फेरबदल, यांना मिळाले मुख्य प्रवक्तेपद

0 130

 शब्दराज ऑनलाईन,दि 19 ः
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य पातळीवरील पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत आक्रमक विरोधी पक्षाचे हल्ले परतवून लावण्याची जबाबदारी अतुल लोंढे यांच्याकडं देण्यात आली आहे. त्याची पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य पातळीवरील पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत आक्रमक विरोधी पक्षाचे हल्ले परतवून लावण्याची जबाबदारी अतुल लोंढे  यांच्याकडं देण्यात आली आहे. त्याची पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे.आघाडी संघटना, विभाग व सेल या विभागाच्या प्रमुखपदी माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनिल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर हे सहप्रमुख असतील. तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत वंजारी हे सहप्रमुख व प्रदेश सरचिटणीस माजी दिप्ती चवधरी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, सहप्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम व सदस्यपदी विश्वजीत हाप्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रामहरी रूपनवर, सहप्रमुखपदी, शाम उमाळकर, संजय बालगुडे, यांची व सदस्यपदी डॉ. हेमलता पाटील आणि जयश्री शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राजकीय कार्यक्रमाच्या नियोजन समिती प्रमुखपदी माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, सदस्यपदी सुर्यकांत पाटील व प्रशांत गावंडे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

error: Content is protected !!