भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय लवळे येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा

1 321

पुणे – भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात लवळे पुणे येथे २२ डिसेंबर, २०२२, गुरुवार रोजी राष्ट्रीय गणित दिवस २०२२ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश “गणिताच्या महत्त्वाविषयी जागरुकता पसरवणे आणि लोकांच्या मनातील गणिताशी संबंधित भीती दूर करणे असा होता. या विशेष दिवशी “रामानुजन प्रश्न मंजुषा” स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत रॅपिड फायर, पास आणि पास प्रश्न, टीम वर्क प्रश्नमंजुषा इत्यादी सारखे गणितावर आधारित अनेक उपक्रम घेण्यात आले. डी.वाय. पाटील पिंपरी, डी.वाय. पाटील आकुर्डी, मराठवाडा मित्र मंडळ, एआयएसएसएमएस आणि विविध संस्थांमधील २५ हून अधिक विद्यार्थी आणि भारती महाविद्यालयातील २७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. मल्लिकार्जुन श्रीगन आणि संशोधक श्री. स्वप्नील काळे, डॉ. आर. एन. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य आणि डॉ. ज्योती ढाणके संयोजीका व समन्वयक व विद्यार्थी वृंद यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

 

 

प्रमुख पाहुणे डॉ. मल्लिकार्जुन श्रीगन, गणित विभाग, भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, वाघोली, पुणे यांनी दैनंदिन जीवनातील गणिताच्या काही महत्त्वाच्या उपयोजना आणि गणितीय मांडणी यावर चर्चा केली. संशोधक श्री स्वप्नील काळे, अप्लाइड मॅथेमॅटिक्स विभाग, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, पुणे यांनी पीपीटी सादर केले आणि सध्याचे युग हे मॅथेमॅटिकल मॉडेलिंग क्षेत्राचे आहे जे अतिशय वेगाने वाढत आहे आणि गणिताच्या मॉडेल्सचा डिझाइन, तपासणी आणि अंदाज यामध्ये वापर होत आहे. सेन्सर्स आणि इतर उपकरणे अभियांत्रिकी डिझाइनमधील प्रमुख प्रगतींपैकी एक आहेत. सन्माननीय अतिथी डॉ.आर.एन.पाटील, प्राचार्य, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय लवळे पुणे यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने उपक्रम आयोजित करण्यासाठी व त्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले आणि सहभागी उपस्थितांना प्रोत्साहित केले आणि यात संशोधकांसाठी भविष्यात भरपूर संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. विद्यार्थी विकास मंडळ आणि आयोजकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या आयोजिका व समन्वयक डॉ. ज्योती ढाणके, विद्यार्थी कल्याण अधिकारी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली व कार्यक्रमाचे उद्दिष्टे स्पष्ट केले.

 

 

कार्यक्रमाच्या शेवटी, विजेत्या संघांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण आणि सत्कार करण्यात आला आणि सर्व सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्राध्यापकांसह सुमारे 160 विद्यार्थी आणि बी.ई.च्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाचे विद्यार्थ्यानी कार्यक्रमास उपस्थित राहून सत्राचा लाभ घेतला. हे सत्र विद्यार्थ्यांसाठी समृद्ध करणारे होते आणि सत्रासाठी आमंत्रित केलेले प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील संवादात्मक चर्चेने या कार्यक्रमाची समाप्ती झाली.

 

 

हर्ष कापसे, नंदिनी महाजन आणि रोहित लबाडे यांनी विद्यार्थ्यांचे समन्वयक म्हणून कार्यक्रमाची रूपरेषा केली. रुपाली सिंग, लोकेश चौधरी, शारदा गोरपडे आणि आर्यन मस्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अंजली अवस्थी, नबील सईद, सुजल गजभिये व श्रुती कडव यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. संगणक विज्ञान, सिव्हिल, ई आणि टीसी आणि मेकॅनिकल इंजीनियरिंग मधील हार्ड कोर मॅथेमॅटिक्सच्या ऍप्लिकेशन्ससह प्रेक्षकांना दैनंदिन समस्यांशी जोडणारा हा कार्यक्रम खरोखरच मनोरंजक होता. भविष्यात अशाच प्रकारच्या गणितीय स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विद्यार्थी वृंद उत्सुक आहेत जे एकत्र शिकण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करू शकतील.

error: Content is protected !!