श्रीक्षेत्र सिन्नरला २६पासून नवरात्र महिला कीर्तन महोत्सव

महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार हजेरी लावणार

0 55

 

 

निफाड, रामभाऊ आवारे – भारतभूमीला लाभलेल्या थोर नामांकित श्री शक्तीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण ,कौटुंबिक एकात्मता, योग्य संस्कार जीवन, हुंडाबळी, स्त्रीभृण हत्या, व्यसनमुक्ती इत्यादी विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी हभप अशोक महाराज घुमरे (भागवत कथाकार) व हभप डॉ टी के सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक भक्तांच्या सहकार्याने व सहभागाने आज सोमवार २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत श्रीक्षेत्र सिन्नर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी भवन विजय नगर, सिन्नर येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती अखिल भारतीय महिला वारकरी मंडळ सिन्नर यांनी दिली आहे.

 

 

दैनंदिन कार्यक्रमात सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व दररोज रात्री ७ ते ९ हरिकीर्तन होणार आहे कीर्तनाची रूपरेषा पुढील प्रमाणे.
सोमवार २६ सप्टेंबर रोजी हभप सौ आरतीताई बुरुकुल (कणकोरी) यांचे कीर्तन ,कीर्तन सेवा सुशिला प्रकाश कोकाटे , मंगळवार २७ सप्टेंबर रोजी हभप मंगल ताई जेजुरकर (जोगलटेंभी) यांचें किर्तन , किर्तन सेवा सुनिता विलास पगार ,बुधवार २८ सप्टेंबर रोजी हभप सौ कल्याणी ताई निकम (थेटाळे) यांचें किर्तन, कीर्तन सेवा सुलोचना अरुण चव्हाणके, गुरुवार २९ सप्टेंबर रोजी ह भ प सौ कावेरीताई घुमरे (सांगवी) यांचे किर्तन, कीर्तन सेवा सौ सिंधुताई नामकरण आवारे ,शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी हभप सौ रेखाताई हांडगे (चांदोरी) यांचे कीर्तन, कीर्तन सेवा निशा अरुण वारुंगसे ,शनिवार १ ऑक्टोबर रोजी राधाताई बिन्नर (नाशिक) यांचे कीर्तन, कीर्तन सेवा सौ अलकाताई विठ्ठलराव जपे, रविवार २ ऑक्टोबर रोजी कु रोहिणीताई ठाकरे (साळसाने) यांचे कीर्तन, कीर्तन सेवा अर्चना दयानंद कोकाटे, सोमवार ३ ऑक्टोबर रोजी सौ कविताताई पगार (लखमापूर) यांचे कीर्तन, कीर्तन सेवा सौ मंगलताई श्याम झगडे, मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी उषाताई आळंदीकर (आळंदी) यांचे कीर्तन ,कीर्तन सेवा गं भा कमलाबाई भास्कर पगार, बुधवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ ह भ प गीताताई हगवणे (घोरवडकर) यांचे काल्याचे कीर्तन, कीर्तन सेवा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था सिन्नर तालुका यांच्या वतीने होणार आहे.

 

या महोत्सवात गायनाचार्य म्हणून ह भ प नारायण महाराज वाघ, किरण महाराज यादव (सिन्नर), मृदुंगाचार्य अविनाश महाराज वाघ (सिन्नर), विणेकरी सविताताई प्रल्हाद चव्हाण ह भ प सौ कावेरीताई बबन आंधळे व या सोहळ्यासाठी कुंदेवाडी, दातली ,कानडी मळा महिला भजनी मंडळ व विठ्ठल सेवा समिती महिला भजनी मंडळ वारकरी भवन (सिन्नर) यांचे सहकार्य लाभणार आहे.

 

तरी या घटस्थापनेच्या शुभपर्वावर सुरू होणाऱ्या नवरात्र महिला कीर्तन महोत्सवात जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग निवडणूक जास्त ज्ञानामृताचा लाभ घ्यावा असे आव्हान सिन्नर तालुका अखिल भारतीय वारकरी महीला मंडळ अध्यक्ष हभप सौ गीताताई हगवणे घोरवडकर व तालुका उपाध्यक्ष सौ प्रतिभाताई सोनवणे सिन्नर व आयोजन कमिटीने केले आहे.

error: Content is protected !!