“शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेयत”, आमदार संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप

0 31

मुंबई : “शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेयत”, असा गंभीर आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. “गुवाहाटीमध्येही बैठका होतायत. पत्रव्यवहारांची माहिती इथल्या आमदारांना दिली जातेय. उपाध्यक्षांबाबत अविश्वास पाठवला जातोय. राष्ट्रवादीला वाटतयं की बंडखोरांना कायद्याच्या कचाट्याच आम्हाला ते अडकू पाहतील. पण हे सगळं नियमबाह्य आहे. त्यांनी तसं केलंच, तर त्यांना आम्ही उत्तर देऊच. यापूर्वी कधीही राष्ट्रवादीचे कोणतेही नेते शिवसेना भवनाची पायरी चढताना पाहिलेली नाही. राष्ट्रवादीच्या मार्गदर्शनाखालीहा पक्ष चालतोय की काय, अशी आम्हाला शंका येतेय. शिवनेसा आमचीच आहे. राष्ट्रवादी शिवसेनेत भांडण लावून मजा पाहतेय”, असं म्हणत संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.“जे काही निधी मिळाला, तो एकनाथ शिंदेंकडून मिळला, म्हणून आमची कामं झाली. रेकॉर्डवर आहे सगळं. ज्या मतादारांनी आम्हाला निवडून दिलं, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला ठोस निधी दिला गेला नाही, म्हणून नाराजी आहे. आम्ही विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव कुणालाही देणार नाही. आमचा गट ठाम आहे. नियमानुसार आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नाही. पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे. आम्ही त्यांना आदर करतो. ते जे बोलले, त्यावर कमेंट करण्याइतका मी मोठा नाही. त्यांनी आमची साथ दिली तर आम्ही जाऊ त्यांच्यासोबत. पण ते आमच्यावरच कारवाई करत आहेत. आमचं ऐकतच नाहीत, हेच आमचं दुखणं आहे”, असं संजय शिरसाटही यांनी म्हटलंय.

शिवसेनेत सध्या उभी फूट पडली आहे. अश्यात उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांनी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अश्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत.

error: Content is protected !!