विमा काळाची गरज- ह भ. प.अच्युत महाराज दस्तापुरकर, जिजाऊ मल्टी सर्विसेसचा उपक्रम

0 15

परभणी,दि 12 ः
 जिजाऊ मल्टी सर्विसेसच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय पोस्ट विभाग शाखा परभणी यांच्या विद्यमाने अपघात विमा योजना हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी उद्घाटक कीर्तन केसरी ह भ प अच्युत महाराज दस्तापुरकर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अभियंता  ओमप्रकाश यादव, प्रमुख पाहुणे पत्रकार सुरज कदम,लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याचे संचालक प्रमोद जाधव गणपतराव खटिंग, विठ्ठलराव देशमुख, मुकुंदराव विटेकर, ऋषिकेश सावंत हे उपस्थित होते त्यावेळी बोलताना मान्यवरांनी या धावत्या युगात विम्याची किती गरज आहे याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय डाक विभागाचे कुलकर्णी, भरतराव शिंदे, पवन खिस्ते, व बालाजी शिंदे व शामसुंदर निरस, विलास साखरे, ओमकार खटिंग, गोपीचंद चोपडे, तुषार दासरवार, दिलीप पवार यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!