सेलूत जप्त केल्या चोरीच्या नऊ दुचाकी:पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई

0 42

 

सेलू,दि 04 (प्रतिनिधी)ः
शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक जयंती मीना यांच्या विशेष पथकाने आणि सेलू पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरित्या कारवाई करत सेलू पोलीस ठाणे हद्दित विविध ठिकाणाहून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील आरोपींची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला कळविण्यात आली आहे.

मागील काही दिवसात परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणाहून दुचाकी चोरीला जात आहेत. त्याच प्रमाणे इतर ठिकाणाहून चोरुन आणलेल्या दुचाकी परभणी जिल्ह्यात चालविल्या जात आहेत. ही बाब लक्षात घेता पोलीस अधिक्षक यांनी विशेष पथकाला चोरीच्या दुचाकींचा शोध लावण्याची मोहिम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ, विशेष पथकाचे पोउपनि. शेख खदीर, निलेश कांबळे, श्रीहरी मुंढे, किर्तीश्वर तेलंगे, संजय सानप, नेताम, माणिक कुलकर्णी, सायबर सेलचे संतोष व्यवहारे यांच्या पथकाने शहरातील रायगड कॉर्नर, क्रांती चौक, जवाहर रोड, शाहू नगर, विद्या नगर आदी भागातून चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. ही वाहने नवा मोंढा, कोतवाली, ग्रामीण पोलीस स्टेशन परभणी, सेलू, पालम, वसमत, औरंगाबाद, अहमदनगर, पोलीस स्टेशन हद्दितून तसेच मध्यप्रदेश येथून चोरीला गेली होती.

error: Content is protected !!