नितीन चषक क्रिकेट स्पर्धा:- बीड व मालेगाव उपांत्य फेरीत दाखल

0 77

नारायण पाटील
सेलू,दि 27 ः
सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमीत
दि. २७ जानेवारी २०२३ शुक्रवार रोजी नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर
मालेगाव वि पी.डी.सी.सी परभणी सामन्यात परभणी संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ११५ धावांत ९ बाद .अझर खान ३३ धावा, शंकर गायकवाड २४,तर सय्यद समीर १४ धावा केल्या. मालेगाव संघाचा भेदक मारा मुजम्मील खान ४गडी तर शेख सादिक २ गडी बाद केले.
११५ धावांचे प्रतिउत्तर देताना
मालेगाव संघाने ११ षटकात ५ बाद ११९ धावा केल्या यात नदीम अन्सारी २८, अझर अन्सारी ३२, इरफान अन्सारी २५ धावा करत अवघ्या ११ षटकात ५ गडी राखुन दणदणीत विजय प्राप्त करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. परभणी संघाचे गोलंदाजी सन्नी पंडित ३ गडी बाद केले.
आ. मेघना दिली साकोरे बोर्डीकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मा ‌आ. हरीभाऊ काका लहाने, सचिव संदीप लहाने उपस्थित होते.
या सामन्यात मालेगाव प्रायोजक प्रतिक काळे यांनी केले. तर परभणी संघाचे मयुर वाघ यांनी केले.
नितीन चषक क्रिकेट स्पर्धा २०२३: सामनावीर पुरस्कार व रोख १०००/- रोख पारितोषिक मालेगाव संघाचा मुजम्मील खान यास प्रदान करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. ऋतुराज सांडेगावकर, माजी आमदार हरीभाऊ काका लहाने, उपपोलिस निरीक्षक माधव लोलुकवार, अविनाश शेरे, कासीम भॉई, प्रदीप काळे
दुपारच्या सञात शेफक बीड वि जवाहर परभणी दरम्यान शेफक बीड संघाने 20 षटकात १५० धावा करत 7 बाद झाले. यात प्रदीप जगदाळे ४६ धावा, असिफ खान ३२,नसीर सय्यद २५ योगदान दिले.
जवाहर परभणी संघाच्या वतीने गोलंदाजी मारा करताना
नारायण कांदे व विठ्ठल खलील याने२-२ गडी बाद केले. १५० धावांच्या प्रतिउत्तर देताना परभणी संघाने २० षटकात. १३२ धावांत ८ गडी बाद झाले.यात नारायण कांदे २३,प्रविण चाळके १९, संदिप ठाकुर १९, धावांचे योगदान देऊ शकले. शेफक बीड संघाच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजी जफर शेआ 3 गडी, प्रविण राठोड २ गडी बाद करून १७ धावांने विजय खेचून आणला.व उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सामनावीर पुरस्कार बीडच्या जफर शेख यास १ हजार रोख व चषक , डॉ. अमर घुले, काटकर, अविनाश शेरे, पवन आडळकर, यांच्या हस्ते देण्यात आले.
आजच्या सामन्याचे प्रायोजक बीड संघाचे पवन आडळकर, तर परभणी जवाहर संघ बंडू देवधर यांनी केले.
दुपारच्या सत्रात जालना वैद्यकीय क्षयरोग अधिकारी डॉ.अश्वमेध जगताप, औरंगाबाद उद्योजक कृष्णा भानूसे, यांनी भेट दिली याप्रसंगी यांचा सत्कार नितीन मंडळाचे अध्यक्ष मा.आ.हरीभाऊ काका लहाने, सचिव संदीप लहाने , विनायक खंडागळे, पांडुरंग कावळे, अविनाश शेरे, यांनी केला उपस्थित होते. स्पर्धा संयोजक:- गिरीश लोडाया, सहसंयोजक:- हरिभाऊ काळे, गणेश माळवे, बंडु देवधर, यांनी परीश्रम घेतले.

error: Content is protected !!