विजेची गरज नाही… विजेशिवाय काम करतात हे एसी

0 82

नवी दिल्ली:Solar ACउन्हाळ्यात घरी AC असावा असे प्रत्येकालाच वाटते. परंतु, किमतीमुळे AC खरेदी करणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसत नाही. तसेच विज बिलाचे टेन्शन असते ते वेगळेच. अशा परिस्थितीत Solar AC हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सोलर एसी पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत आणि वीज बिल ८० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात मदत करतात. सामान्य एसीशी तुलना केल्यास, सोलर एसी वापरून युजर दरमहा सुमारे ६०० युनिट वीज वाचवू शकतो. याचा अर्थ असा की, युजर्सचे वीज बिल तब्बल ५००० ते ६००० रुपयांनी कमी होऊ शकते. सोलर एसीबद्दल विस्तृतपणे सांगायचे तर, आकडेवारीनुसार, पहिला सोलर एसी २००९ मध्ये बनविण्यात आला होता.

काही वर्षांनी त्याची विक्री सुरू झाली. सुरुवातीला लोकांचा यावर विश्वास नव्हता. पण, हळूहळू लोकांचा सोलर एसीवर विश्वास बसायला लागला आहे आणि हे एसी खरेदी करण्याकडे लोकांचा काल देखील वाढतो आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) च्या अंदाजानुसार, २०५० पर्यंत उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होईल. यामुळे एअर कंडिशनरची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकते. म्हणजेच, मागणीत तीन पट वाढ दिसू शकते. भारत, इंडोनेशिया आणि चीनसारख्या देशांमध्ये ही मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. IEA नुसार येत्या १० वर्षात AC ची मागणी झपाट्याने वाढेल. अधिकाधिक लोक AC सारखी उपकरणे खरेदी करण्याचा विचार करतील. पण AC चा वापर जितका वाढेल तितका विजेचा वापरही वाढेल. अशा परिस्थितीत पर्यावरणाचा विचार करून सोलर एसी सुरू करण्यात आला आहे.

किंमत किती आहे?
सोलर एसीची किंमत साधारणपणे ४५,००० रुपयांपासून सुरू होते. टन क्षमतेनुसार त्यांची किंमत बदलते. इनडोअर युनिट वगळता सर्व एसी पार्ट्स भारतात बनवले जात असलयाचे सांगितले जाते. इनडोअर युनिट थायलंडमधून आयात केले जातात. Solar AC साठी तुम्हाला तुमच्या छतावर ३२० वॅटचे पॅनल्स बसवावे लागतील.

काय लक्षात ठेवावे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलर एसी चालवणे पूर्णपणे सूर्यप्रकाशावर अवलंबून असेल. तुमच्या घरी पुरेशी जागा असल्यास हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.

error: Content is protected !!