आत्ता लॉकडाऊन नाही, तर …राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहीती

0 220

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. क्वॉरंटाईन कालावधी किती दिवसांचा असावा इथपासून ते लॉकडाऊन लावावा की लावू नये आदींबाबत आज मोठे निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

ऑगमेंटेड रिस्ट्रीक्शन्स!

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली. राज्यातली सध्याची परिस्थिती पाहाता टास्क फोर्सनं लॉकडाऊनऐवजी ऑगमेंडेट रिस्ट्रीक्शन्स लागू करण्याचा प्रस्ताव दिल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले.

“टास्क फोर्सनं ऑगमेंटेड रिस्ट्रीक्शन्स असा शब्द वापरलाय. म्हणजे अशीच संख्या वाढत गेली, तर लॉकडाऊनसारखा १०० टक्के बंद करण्याची आज तरी गरज नाही. पण अनावश्यक गोष्टींवर दररोजची रुग्णसंख्या तपासून बंधनं आणता येतील का? याविषयीचा निर्णय घेतला जाईल. या विषाणूला रोखण्यासाठी गर्दी थांबवणं गरजेचं आहे. त्यानुसार गर्दी करणाऱ्या गोष्टींवर काही निर्बंध टाकण्यासाठी निर्णय घेतला जाईल. पण आजच त्यावर निर्बंध टाकले जातील, असं नाही. मुख्यमंत्र्यांना त्यावर माहिती दिली असून त्या त्या वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल”, असं राजेश टोपे म्हणाले.

आता बाधितांच्या मॉनिटरिंगवर भर!

राज्यातील कोरोना संसर्गाने बाधितांची संख्या वाढत आहे, ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. कोरोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्याचं देखील राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.

आरटीपीसीआरवर भर

कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार आहे. रुग्णसंख्या 30 हजारापर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे प्रत्येकाचा आरटीपीसीआर केल्यास ताण पडेल. दीड ते पावणे दोन लाख आरटीपीसीआर दरदिवशी करण्यात येणार आहे. रॅपिड अँटिजेन टेस्ट करणार. अँटिजेनवर पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीआर होणार नाही. किऑस्क द्वारे अँटिजेन कराव्यात, अशा सूचनाही संबंधितांना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

क्वॉरंटाईन कालावधी सात दिवसांचा

फेवीपिराविर आणि मोनू पिरावीर ही दोन औषधे प्रभावी ठरत आहेत. मात्र मोनू पिरावीरची उपलब्धता नाही. एक लाख ड्रग्ज आहेत. अधिक डोस देण्याची केंद्राला विंती केली आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच आता क्वॉरंटाईनचा कालावधी 7 दिवसांचा करण्यात आला आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना ज्या भाषेत समजत असेल त्यांना त्या भाषेत समजावून त्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

error: Content is protected !!