“आता आरक्षण-आरक्षण बस झालं, …. ”, पुण्यात शरद पवारांचं मोठं विधान

0 377

पुणे – “आरक्षणासाठी संघर्ष व्हायचे पण आता आरक्षण-आरक्षण बास झालं”, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. नव्या पिढीचं अर्थकारण बदलेपर्यंत स्थान बदलणार नाही, असंही ते म्हणाले. संभाजी बिग्रेडने आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातून त्यांनी आरक्षण, शेतकरी आणि मराठा समाज आदि विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, त्यांनी आरक्षण आणि नव्या पिढीचं अर्थकारण यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

 

“एक काळ होता की आरक्षणासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या. पण आता हा विचार केला की, आता आरक्षण-आरक्षण बास झालं, जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकारण बदलत नाही तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

 

“अर्थकारणाची दिशा दाखवणारं एक चर्चासत्रे इथे झाले. त्यातील एक चर्चासत्र हे आरक्षणातून अर्थकारणाकडे होतं. या सगळ्या क्षेत्रात जे यशस्वी झाले अशा तुमच्यातील काही सहकाऱ्यांना बोलवून त्या सगळ्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही अतिशय चांगली गोष्ट आहे”, असं शरद पवार म्हणाले.

 

 

“आज मराठा म्हटल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. काही लोकं वेगळ्या दृष्टीने बघतात. मराठा याचा विचार करताना मराठी माणूस, समाजातला उपेक्षित माणूस, समाजातील कष्टकरी माणूस असं चित्र आपल्यासमोर येतं. मराठ्याचं वैशिष्ट्य म्हणजे विविध जातीच्या समाजाला सोबत घेऊन आपल्याबरोबर त्यांची उन्नती कशी होईल याचा विचार करणारा वर्ग म्हणजे तो मराठा”, असं शरद पवार म्हणाले.

 

error: Content is protected !!