संभाजी ब्रिगेडच्या मुंबईतील अधिवेशनासाठी परभणीतून पदाधिकारी रवाना

0 134

परभणी,दि 29 
संभाजी ब्रिगेडच्या मुंबईतील अधिवेशनासाठी परभणी येथून पदाधिकारी सोमवारी (दि.29) रवाना  झाले.
मुंबई येथे बांद्रा पश्चिम रंगशारदा येथे  संभाजी ब्रिगेडच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी परभणी  येथे त्यांना निरोप देण्यात आला. संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते. महानगराध्यक्ष गजानन जोगदंड. जिल्हा सचिव साहेब शिंदे यांच्यासह नऊ तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकारी रवाना झाले आहेत.राज्यातील विविध प्रश्नावर या अधिवेशनात चर्चा करुन पुढील रणनिती ठरवली जाणार असल्याची माहीती गजानन जोगदंड यांनी दिली.

error: Content is protected !!