आषाढी एकादशी निमित्त रामपुरीत लोकसहभागातून राबविली सोहळावृक्ष लागवड मोहीम

0 51

परभणी,दि 11 ः
रविवार दि.10 जुलै 2022 रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून मानवत तालुक्यातील रामपुरी बु येथील स्मृती उद्यानात वृक्षवल्ली फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या नेतृत्वात 120 वृक्षांची लागवड करून समाजाला वृक्ष लागवड करण्याचा अनमोल संदेश देण्यात आला.

वृक्ष लागवडीत ताह्मण-20 नारळ-10 नागचाफा-10 लाल चाफा-10 चेरी-10 बोगनवेल-22 टिकोमा-10 आंबा-1 पेरू-1 अरेका पाम-2, बकाननीम-2 गुलाब-22 अशा विविध प्रकारच्या 120 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्षवल्ली फाउंडेशनच्या माध्यमातून गाव हरितग्राम करण्यासाठी रामपुरी बु.येथील युवक माझं गाव हेच माझं तीर्थ समजून मोठ्या जोमाने काम करत आहेत.
रामपुरी मध्ये 2017 ते 2019 पर्यंत 3000 व 2020 वर्षी 4000 व 2021 साली 5000 आणि 2022 मध्ये अद्यापपर्यंत विविध प्रसंगी 3000 हुन अधिक वृक्ष लागवड केलेली आहे. आता पर्यंत गावात एकूण सुमारे 15000 वृक्ष लागवड ( ट्री गार्ड व ड्रीप सह) करण्यात आली आहे.
वृक्ष लागवड मोहिमेसाठी दत्तात्रय उंदरे, अविनाश राऊत, अर्जुन तलवारे, संदीप यादव,संतोष यादव, वसंत यादव, नितीन यादव, विश्वनाथ राऊत, अजय जैस्वाल, सतीश बनसोडे, वैभव फुलपगारे, दिनेश थोरात, गजानन शहाणे, धीरज वायकोस, ज्ञानेश्वर वाघमारे, माधव बनसोडे, वारे सर, विठ्ठल शिंदे, दिगंबर चव्हाण, कारभारी गांधारी आदित्य यादव व वृक्षवल्ली फॉउंडेशन चे सदस्य उपस्थित होते.

सध्या वृक्षलागवडी साठी योग्य कालावधी असून लोकसहभागातून गावोगावी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. रामपुरी हरितग्रामचे उत्कृष्ट उदाहरण असून मागील 5 वर्षापासून रामपुरीकरांनी सातत्याने वृक्ष लागवड केली आहे. ही भूमिपुत्र म्हणून अभिमानस्पद बाब आहे.
ओमप्रकाश मं. यादव
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
जिल्हा परिषद,परभणी

error: Content is protected !!