स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तहसील कार्यालय सेलू येथे रक्तदान शिबिर संपन्न.!

0 52

सेलु,दि 16 ः
सेलू येथील तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण पार पाडल्यानंतर सेलू शहरातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी सेलू उपजिल्हाधिकारी सौ.अरुणा संगेवार, तहसीलदार श्री दिनेश झांपले,नायब तहसीलदार श्री थारकर,सेलू तलाठी संघाचे अध्यक्ष श्री मुकुंद आष्टीकर,साईबाबा बँकेचे अध्यक्ष श्री हेमंतराव आढळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या उपस्थितीत सेलू शहरातील सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी तथा मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अभिजित राजूरकर यांनी स्वेच्छेने रक्तदान करत शिबिराची सुरवात केली.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने ३१ रक्तदाते सहभागी झाले होते.रक्तपेढीच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपक्रम यशस्वीतेसाठी तहसील कार्यालय अधिकारी कर्मचारी व सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!