विद्यार्थी सहायक समिती मध्ये पर्यावरण पुरक झिरो बजेट गणेशोत्सवाचे आयोजन

0 6

 

पुणे : दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गणेशोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे पुण्यातील विद्यार्थी साहाय्य्क समिती मधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे हा गणेशोत्सव ‘झीरो बजेट’ असतो. परिसरातील टाकाऊ वस्तू यासाठी उपयोगात आणल्या जातात. मुलांच्या लजपतराय विद्यार्थी वसतिगृहात,मुलींच्या आपटे वसतिगृहात तसेच सुमित्रासदन वसतिगृहात हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो.

 

या तिन्ही वसतिगृहातील गणेशोत्सवात यंदा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या विठ्ठल भक्तीचे अतुट नाते आकर्षक देखाव्यातून मांडण्यात आले आहे.
विठ्ठल भक्तीची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर वारीमधुन चैतन्याचा प्रवास अनुभवणारे वारकरी, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यातील वारकरी, शेतातील डौलाने उभा राहिलेले पिक याची आरास निर्माण केली आहे, तर जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या संतांचे अभंग आजुबाजुला चिञबद्ध केले आहेत.

 

तसेच “ज्ञानसत्र’ अंतर्गत विविध सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तीनही वसतिगृहाचे पर्यवेक्षक, समितीचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यामध्ये विद्यार्थ्यांना सहकार्य, मार्गदर्शन केले.

 

समितीच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण पुरक झिरो बजेट गणेशोत्सव. गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या सामाजिक जाणिवेची संकल्पना घेऊन विद्यार्थी हा उत्सव साजरा करतात. यात कुठेही धार्मिकतेचा अवडंबर नसतो, तर तो ज्ञानसत्र म्हणून साजरा केला जातो, वस्तीगृहातील बागेच्या परिसरातील मातीपासून विद्यार्थ्यांनी तयार केला गणपती, सजावटीसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या ओढण्या, नैसर्गिक रंग कलात्मक कृतीतून केलेली सजावट आणि त्याला वैचारिक विचारांची जोड देत ज्ञानसत्राचे आयोजन हेच या गणेशोत्सवाचे वेगळेपण आहे.

– तुकाराम गायकवाड
विद्यार्थी साहाय्यक समिती कार्यकारी विश्वस्त

 

समितीच्या गणेशोत्सवाचे एक वेगळेपण आहे पुण्यात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा उत्सावातुन वैचारिक विचारांच मंथन घडावे यासाठी ज्ञानसञाचे आयोजन करण्यात येत विद्यार्थी या उत्साहात सामिल होत दरवर्षी दर्जेदार नवीन संकल्पना घेऊन वेगवेगळ्या स्वरूपात विचारांचा ठेवा जपत सामाजिक जागृतीचा संदेश उत्सवातून दिला जातो समिती गणेशोत्सव म्हणजे उर्जा देणारा एक सोहळा असतो.समितीचा माजी विद्यार्थी असुन गणेशोत्सवात सामिल होताना कायमचं आनंद अनुभवायला मिळतो.
लक्ष्मण जाधव, समिती माजी विद्यार्थी

error: Content is protected !!