सेवा पंधरवाडात समाधान शिबिरांचे आयोजन करा-आमदार समिर कुणावार

0 15

हिंगणघाट, दि१५ (प्रतिनिधी)ः
भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांचा वाढदिवस शनिवारी (दि.17)  संपुर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होणार असून यानिमित्ताने राज्य शासनाने विविध योजनांचा लाभ थेट सर्व सामान्य नागरीकांना कसा पोहोचवता येईल याकरीता सेवा पंधरवाडा अंतर्गत कार्यक्रम राबविण्याच्या सुचना केलेल्या आहेत.

त्यानिमित्ताने आमदार समीर कुणावार यांनी आज विधानसभा क्षेत्रातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेत सर्व योजनांबाबत सविस्तर चर्चा करत मागील त्यांनी ज्या पध्दतीने समाधान शिबिरांचे आयोजन करत एकाच ठिकाणी नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला त्याच पद्धतीने सर्व विभागांनी योजना राबवत नागरीकांना लाभ देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिल्यात.यावेळी बैठकीला किशोर दिघे, अंकुश ठाकुर आकाश पोहाणे उपविभागीय अधिकारी हिंगणघाट, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट , उपविभागीय कृषी अधिकारी तहसीलदार हिंगणघाट,समुद्रपूर ठाणेदार हिंगणघाट,समुद्रपूर, मुख्याधिकारी नगरपालिका हिंगणघाट, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी हिंगणघाट समुद्रपूर अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी , उपविभागीय अभियंता सां.बा.विभाग, उपविभागीय अभियंता जिप बांधकाम विभाग ,तालुका वैद्यकीय अधिकारी,नायब तहसीलदार आदी विभागातील अधिकारी उपस्थित होते….

error: Content is protected !!