जिंतूरात रक्तदान शिबिराचे आयोजन

0 17

जिंतुर,दि 12 ः
जिंतूर शहर व परिसरातील थायलेसिमीया ग्रस्त बालकांसाठी ओमप्रकाश शेटे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त जानिमिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात मंगळवार 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्याचे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शहर व परिसरात बहुसंख्येने थायलेसिमीया ग्रस्त बालकांचे प्रमाण असल्यामुळे दर महिन्याला सदरील बालकांना मोठा रक्ताचा पुरवठा लागतो. त्या रक्त साठ्याची पूर्तता करण्यासाठी शहरातील जानिमिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने ओमप्रकाश शेटे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावे असे आवाहन  जानिमिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष शेख वाजीद, सचिव शेख समीर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!