वसंतदादा पाटील शिक्षण संकुलात रोजगार मेळाव्याचे आयोजन

0 65

 

गुरुदत्त वाकदेकर
मुंबई,दि 20 ः पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या शीव येथील शिक्षण संकुलात इंजिनिअरिंग आणि व्हिज्युअल आर्ट विषयातील विद्यार्थ्यांसाठी २१ ते २३ जुलै २०२२ या कालावधीत जॉब फेअर (रोजगार मेळावा) उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाने त्याचे आयोजन संस्थेचे जनरल सेक्रेटरी आप्पासाहेब देसाई, अध्यक्ष नंदकुमार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले असल्याची माहिती विभागप्रमुख प्रा. स्वप्नील देसाई यांनी दिली आहे.
या उपक्रमात २० हून अधिक कंपन्या सहभागी होत असून त्यातून विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होणार आहे. २०१९ ते २०२२ या कालावधीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यासाठी पात्र असतील. आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, बी. एस्सी, एम. एस्सी, बीसीए, एमसीए, बँचरल ऑफ इंजिनिअरिंग या पदवीधारकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. या ठिकाणी नोंद करणार्‍यांच्या मुलाखती घेण्यात येणार असून त्याच्या वेळा सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ अशा असतील. नोंदणीसाठी पुढील लिंक देण्यात आली आहे. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfqf_FmaBdenu_2TeKWZbDJNkLb2FwI1G65J6-XGadkybBo5w/viewform. हे शिक्षण संकुल पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव, एव्हरार्ड नगर येथे आहे, अशी माहिती प्रशिक्षण आणि रोजगार विभागाचे प्रमुख प्रा. स्वप्नील देसाई यांनी दिली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त करून देण्याचा संस्थेचा उद्देश्य असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

error: Content is protected !!